Project by RCP Pashan Back

आनंद-दूत:

दिनांक २२ सप्टेंबर ला झालेल्या तुफानी पावसात धाराशीव जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पूरिस्थती निर्माण  झाली. जवळ जवळ ७००० एकर शेतातील माती वाहून गेली. पिकांचे नुकसान झाले. अनेक घरातील सामान वाहून गेले. शाळेतील शैक्षणिक साहित्याचे नुकसान झाले. अशा आपत्तीग्रस्त भागात रोटरीची मदत सुद्धा तातडीने पोचली होती.  

आमच्या क्लबचे पास्ट  प्रेसिडेंट, अंजली आणि प्रदीप मुळ्ये, यांची Tata Institute of Social Science चे Vice dean डॅा. संपत काळे आणि त्यांच्या पत्नी सौ. मेधा काळे यांच्याशी भेट झाली. काळे दाम्पत्य हे धाराशीव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील आधार  संस्थेबरोबर काम करतात. त्यांच्याकडून आम्हाला तिथल्या काही मूलभूत गरज पुरवण्याबाबत विनंती आली. ही विनंती आल्यानंतर Past President प्रदीप मुळ्ये आणि Past President हेमंत जेरे यांनी प्रत्यक्ष परंडा तालुक्यात जाऊन पाहणी केली. 
तेथील गावकऱ्यांची भेट घेतली. तेथील एका ९० वर्ष वय असलेल्या वृद्ध व्यक्तीने सांगितले की तो माणूस एवढी वर्ष तिथे राहतोय पण असा पाऊस आणि असा पूर आजपर्यत कधीच आला नव्हता. 

या परिस्थतीत मदत करण्याकरता पाषाण क्लब काय करु शकेल याचा आढावा घेतला आणि येतायेता गाडीत त्यांनी project plan तयार केला. तेथील ६०० मुलांना school kits (ज्यामध्ये एक sack, पाण्याची बाटली, ६ वह्या, २पेन, पेन्सिल, खोडरबर, पट्टी इ. साहित्य) फक्त ३ fदवसात उपलब्ध केले. जिथे मुलांसाठी दुपारचे जेवण बनवले जाते, त्या अंगणवाडीमधील भांडी वाहून गेली होती. ती पण द्यायची असं आम्ही ठरवलं. केवळ २ दिवसात या सर्व गोष्टींची व्यवस्था केली. या बाबत Director, Disaster Management (RID 3131), डॉ. राजीव गोखले यांच्याशी बोलणं झालं. त्यांना या project ची कल्पना खूप आवडली आणि ते प्रोजेक्टला निघण्यापूर्वी आम्हाला flag off करायला खास गोरेगावहून आले. एवढंचनाही तर DG संतोष नी सुद्धा या प्रोजेक्टसाठी डिस्ट्रिक्टच्या फंडस् मधून काही रक्कम देण्याचे ठरवले.

परंडा तालुक्यातील देवगाव (खुर्द) आणि वडनेर (खुर्द ) मधील शाळेत गेलो. तिथे बघीतले तर शाळेच्या भिंती अर्ध्याहून अधिक ओल्या, कपाटातील सव साहित्य वाळवत ठेवलेलं. Tabs, e learning kits हे सर्व पाण्यात भिजून बंद पडलेलं. सव विद्यार्थ्यांची ची वह्या पुस्तकं दप्तरं वाहून गेलेली. पूर आल्यानंतर काही दिवस तिथल्या ‘आधार सामािजक संस्था’ यांनी सगळं स्थिरस्थावर होईपयत सर्व गावकऱ्यांना जेवण पुरवलं. आम्ही जेव्हा मुलांना शालोपयोगी साहित्य वाटप केलं, तेव्हा त्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता. शिक्षक सांगत होते की जेव्हा ते उपाशी होते तेव्हा जेवण मिळाल्यानंतर सुद्धा त्यांना इतका आनंद झाला नसेल तितका आत्ता अभ्यासाची पुस्तकं वह्या मिळाल्यावर झालेला दिसतोय.
संयोfगता चौधरी नावाची ६ वी मधली मुलगी - जेव्हा पूर आला तेव्हा पाण्यातून वाहत आलेला साप तिच्या आईला चावला. तिचे वडील आईला घेऊन दवाखान्यात गेले. घरात संयोगिता आfण तिचा तिसरीतला भाऊ दोघेच होते. त्यावेळी पुराचं पाणी घरात शरलं म्हणून ती भावाला घेऊन घराच्या पत्र्यावर चढली. जवळ जवळ १० तासांनी हेलिकॉप्टरनी तिची सुटका केली. त्या गोष्टीची भीती अजूनही तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या म्हणण्यानुसार एवढा पूर या पूर्वी कधीच आला नसल्याने आता त्यांच्या मनात सतत भीती निर्माण झाली आहे. त्यांना रात्र रात्र झोप लागत नाहीये.

तिथली एकंदर परिस्थिती पाहता त्यांना अजून खूप मदतीची गरज आहे असं जाणवलं आणि थोडं मन उदास झालं होत. पण मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आशा निर्माण झाली की पुन्हा सगळं सुरळीत होईल. लवकरच होईल.

रो. प्राजक्ता जेरे
प्रेसिडेंट - रोटरी क्लब ऑफ पुणे पाषाण

(या प्रोजेक्टचा एकूण खच रू.२.७५ लाख झाला)