"सर्वांसाठी आरोग्य सर्वांसाठी तंदुरुस्ती"
२६ मार्च २०२५ रोजी "सर्वांसाठी आरोग्य सर्वांसाठी तंदुरुस्ती" या विषयावर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे "बिल्ड क्लिनिक" आणि रोटरी क्लब पुणे पर्वती यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या व्याख्यानमालेतील तिसरे सत्र झाले. शारीरिक तंदुरुस्ती अर्थात फिजिकल फिटनेस आणि आरोग्य या विषयावरील भाषणात रोटेरियनस, स्पाऊसेस तसेच नॉन रोटरीयन्स प्रेक्षक उपस्थित होते. अतिशय सोप्या भाषेमध्ये डॉ. प्रमोद पाटील यांनी व्यायामाचे महत्त्व सांगून श्रोत्यांच्या विविध विषयांवरील प्रश्नांची अतिशय सविस्तर उत्तरे दिली ज्यामुळे श्रोत्यांना वैयक्तिक व्याधींना सुद्धा सामोरे जाताना उपयोग होईल.
Project - Erase the e-waste
Continued good response and good words from Punities have started sounding confidence in us.. Change which we thought of 5 years ago, seems getting through.
Rotary Club Pune Parvati & Pune Mideast, ESRAG South Asia in collaboration with JANWANI,, arranged an Awareness and Collection drive for eWaste & plastic waste at Mitra Mandal society Pune on 23rd March 25. There was a que for donors since start of collection.
PDG Rtn.Rashmi Kulkarni, Rtn. Esragian Surender Gupta, Rtn.Manjusha, Rtn.Ranjana, Rtn. Romesh & many other Rotarians from both the participating clubs were very contended with the response. Residents requested Rotary clubs to explore the possibility to arrange such drives every month or alternate month.. They appreciated and blessed Rotary Initiative on Sustainable Environment..
Be Environment Friendly. 👏👏
रोटरी अंतर क्लब नाट्यवाचन स्पर्धा २०२४ - २५
रोटरी क्लब पुणे पर्वतीचा सिग्नेचर प्रोजेक्ट म्हणून ओळख असलेली अंतर रोटरी नाट्यवाचन स्पर्धा दिनांक ११ मार्च ते १३ मार्च या कालावधीत सुदर्शन रंगमंच येथे पार पडली. हे या स्पर्धेचे सतरावे वर्षे होते. दरवर्षी अनेक क्लबज या स्पर्धेत उत्साहाने भाग घेतात. यावर्षी एकूण नऊ संघांनी भाग घेतला होता. ११ मार्चला या स्पर्धेच्या शुभारंभासाठी आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात रंगकर्मी सौ.प्रतिभा भगत लाभल्या होत्या. याशिवाय या स्पर्धेच्या सन्माननीय अतिथी होत्या रोटेरिअन सुनेत्रा मंकणी .या दोघींच्या मनोगताने स्पर्धकांचा उत्साह वाढवला. शुभारंभचे पहिले नाट्य वाचन रोटरी क्लब ऑफ दौंड ने केले. दौंड क्लबचे या नाट्यवाचन स्पर्धेत भाग घेण्याचे हे दुसरेच वर्ष आहे. इतक्या लांबूनही ज्या उत्साहाने हा क्लब स्पर्धेत भाग घेतो त्याबद्दल त्यांचे कौतुक वाटते. त्यांनी यावर्षी 'सखी सावित्री : नांदी बदलाची' या स्वलिखित संहितेचे अभिवाचन केले. बारा मार्चला आर सी नॉर्थ ने 'पाऊस' या कथेतून पावसाचे वेगवेगळे रंग दाखवले . आर सी हेरिटेज ने 'चूक भूल द्यावी घ्यावी' हे दिलीप प्रभावळकर यांचे एव्हरग्रीन नाट्य सादर केले . आर सी साउथ ने 'इस खेल मे हम हो ना हो' असे म्हणत एका गहन विषयावर खेळीमळीने भाष्य केले. दुसऱ्या दिवशीचे शेवटचे नाट्यवाचन आर.सी पाषाण यांचे होते त्यांनी इरफान मुजावर यांचे अल्पविराम हे खेळवून ठेवणारे नाट्य वाचन तेवढ्याच ताकदीने सादर केले.
१३ तारखेला अगदी ऐनवेळी स्पर्धेत भाग घेतलेल्या रोटरी क्लब हिलसाईडने 'आयाम' हे नाट्य वाचन सादर करून स्पर्धेला वेगळाच आयाम दिला. आर.सी. कोथरूड ने 'आनंदाने जगायचे' असे म्हणत जीवनाकडे आनंदाने पहाण्याचा दृष्टिकोन दिला, तर आर. सी. फिनिक्स ने 'सौ चुहे खा के' असे म्हणत एक कोर्टरूम ड्रामा सादर केला. या स्पर्धेचा शेवट आर.सी. शिवाजीनगरने डेटिंग ॲप आणि तत्सम सोशल मीडियावर हरवलेल्या तरुणाईला 'धुक्याच्या पलीकडची' वाट दाखवली. !
या स्पर्धेसाठी श्री. देवेंद्र भिडे आणि सौ केतकी पंडित या परीक्षक म्हणून लाभल्या होत्या. दोघांनी अगदी पारदर्शकपणे या स्पर्धेचे परीक्षण केले. १७ मार्च रोजी या स्पर्धेचा बक्षीस समारंभ प्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले यांच्या हस्ते झाला. 'पाऊस' या आर.सी. नॉर्थ यांनी सादर केलेल्या नाट्यवाचनाला प्रथम पारितोषिक मिळाले. या दिवशी सौ. मंगला गोडबोले यांनी केलेले भाषण आणि दोन्ही परीक्षकांनी केलेले त्यांचे मनोगत ऐकून कान तृप्त झाले.
ही स्पर्धा दरवर्षी घेताना पर्वती क्लबला एका लग्नघराचे स्वरूप आलेले असते. सर्व उत्साही मेंबर्स घरचे कार्य असल्याप्रमाणे या स्पर्धेची तयारी करतात.
'देणे निसर्गाचे '
'देणे निसर्गाचे ' ह्या उपक्रमा अंतर्गत "मायक्रो ग्रीन्स " ह्या विषयावर आठवे सत्र २९ मार्च रोजी झाले. ज्ञान प्रबोधिनी अणि पर्वती क्लब ह्यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प चालू आहे गेले आठ महिने.
डाॅ.शिल्पा नाईक ह्यांनी अत्यंत सोप्या शब्दात मायक्रो ग्रीन्स म्हणजे नक्की काय? आपण घरी ते कसे पिकवू शकतो, त्यांचे अनेक फायदे कसे असतात अशा अनेक गोष्टींवर भाष्य केले. उदा.
कॅल्शियम, शुगर (नियंत्रण) प्रथीने इत्यादी.हे समजावून सांगितले.
घरामध्ये सहज वाढणारे ताजे , स्वस्त
खूप पौष्टीक आणि कीटकनाशक मुक्त
बाल्कनी किंवा खिडकीत येते
विविध चवी जेवणात मिळतात.असे हे बहु्गुणी कसे असतात ते सांगितले.
ह्या सत्रास जवळपास चाळीस जणांची उपस्थिती होती.
वेल्हे गावातील महिलांना ह्यात काही उद्योगाचे साधन मिळू शकेल म्हणून सहा जणींना सत्राच्या आधी वेगळे प्रशिक्षण दिले.
अध्यक्ष रो. वृषाली खिरे
रोटरी क्लब पुणे पर्वती