Thoughts and guidance from our esteemed PDGs- PDG Rashmi Kulkarni Back

1987 सालचा आमचा पर्वती क्लब ! विनय चार्टर्ड मेंबर !

2000 साली डीजी अरुण कुदळे यांनी आमच्या क्लबला डिस्ट्रिक्ट असेंबलीचे यजमान पद दिले .डॉक्टर माधवच्या गैरहजेरीमुळे अचानकच ही जबाबदारी विनयच्या गळ्यात पडली आणि जशी सुभाष घईला ‘कर्ज’ चित्रपटामुळे

यशाची पहिली चव चाखायला मिळाली तशी आम्हाला रोटरीची झिंग त्यावर्षी कळली ! 

मी रोटेरियन झाले!

मग त्याची प्रेसीडेंसी मग गव्हर्नरशिप !       

आता यात माझा प्रवास कुठे!  

एक अतिशय ॲक्टिव्ह अँन म्हणून भरपूर काम मी करत होतेच तरी माझा समज एकूण कार्यक्रमात बॅकस्टेज मॅनेजमेंट बघणे इतपतच सहभाग घ्यायचा असा होता त्यातून मी बाहेर पडले तेव्हा ;जेव्हा विनयच्या GMLमध्ये मी केलेले लिखाण ! ते प्रचंड लोकप्रिय झालं आणि हा एक नवीनच शोध मला लागला ;त्यामुळे त्याची गव्हर्नरशिप संपताक्षणी दुसऱ्याच दिवशी मी कॉलनीची चेअरमनशिप स्वीकारली आणि तिथे *मित्रवार्ता* नावाचं एक उत्तम नियतकालिक चालू केलं.

 नंतर तो भराभर वर चढत डिस्ट्रिक्ट बाहेर आणि देशाबाहेरही गेला आणि डिस्ट. लेव्हलला माझे काम जोरात सुरू झाले.

 त्यात ऋद्धी RYE ला गेली आणि माझ्यासाठी हे नवीनच उत्साही असं दालन उघडलं गेलं ! 

माझ्याकडे आलेली अनंत मुलं तर मला मिळालीच पण पंधरा ते अठरा वयोगटातल्या या उत्साही मुलांची कंपनी मला फारच रुचली. नंतर लगेचच मी RYE चेअरमन झाले आणि एकूण रोटरीत झोकून दिले.  दरम्यानच्या काळात सिल्वर ज्युबिली प्रेसिडेंट म्हणून माझी निवड झाली आणि ते वर्ष खूप उत्साहाचं, मला बरेच शिकवणारे, आनंद देणारे पण अतिशय खडतर गेले!

आता विनयच्या बॅकग्राऊंडबद्दल मला कोणी विचारलं की रोटरी ही विनयचे आवड ; आवड कसली ,व्यसनच म्हणाना; आहे हे खरं; पण तुला होती का एवढी हौस?

तर उत्तर म्हणजे; मी अगदी आर्य पतिव्रता! मागोमाग चालणारी! तुम्हाला अगदी अविश्वास वाटला तरी !!! 

प्रेसिडेंटशिप नंतर सर्व avenuesमध्ये काम करत गेले, आवडत गेलं, यश मिळत गेलं आणि आपोआपच धडकत धडकत गव्हर्नरशिपकडे वळले! डीजी अभयमुळे 2017 सालापासून 2020 सालच्या गव्हर्नरशिपसाठी भरपूर प्लॅनिंग, भरपूर अभ्यास करायला वेळ मिळाला! पण हाय रे दैवा! देवाला मंजूर नव्हते; कारण 2020 सालच्या मार्चमध्येच कोविडचे आगमन झाले आणि पुढचे जवळजवळ वीस महिने अख्ख्या जगात त्याने हाहाकार माजवला. रस्ता बदलला तरी काम करायचा उत्साह, इच्छा आणि शक्ती होतीच त्यामुळे त्याही वर्षी भरपूर काम, भरपूर डोनेशन्स, काम केल्याचं भरपूर समाधान, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भरपूर मित्र-मैत्रिणी मात्र मिळाले ! (आकडेवारी आहेच $1.8 M for TRF त्याशिवाय १० cr चे CSR चे प्रोजेक्टस, विक्रमी पोलियो फंड, $ 1 M चे वॉटर प्रोजेक्ट्स ! कोविड सेंटर आणि प्रचंड काम !३५००० टिचर्स ट्रेंड इ इ) !

आता या सर्व भानगडीत माझ्या प्रोफेशनल करिअरचं काय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल .

पण ते असं आहे; शाळेत फिजिओलॉजी शिकताना आपण श्वसन संस्था, पचन संस्था, असे वेगवेगळे शिकतो, ते एकमेकांशी कसे रिलेटेड आहेत आणि एकाच शरीरात कसे फिट बसलेत ते मुळीच कळत नाही कारण तेव्हा शाळा तिसरी डायमेन्शन शिकवतच नाही .

तसंच घर, रोटरी करताना प्रोफेशनल करिअर पण याच काळात आपली आपली जागा शोधून चपखल बसलेच! 

2024 मध्ये ,गव्हर्नर इलेक्ट्स ना ट्रेनिंग देण्याची मिळालेली संधी हा आतापर्यंतचा मानाचा तुरा!

रोटरीने दिले मित्र 

रोटरीने दिली उत्कृष्ट टाइम मॅनेजमेंट 

( त्यामुळे १५ वर्षात ४० वर्षांचे काम) 

आणि रोटरीने दिला माणुसकी आणि चांगुलपणावरचा विश्वास !!!!

हे पटले की एक बार रोटेरिअन, 

जिंदगीभर रोटेरिअन!

 

रो.रश्मी कुलकर्णी
पास्ट रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ( डिस्ट्रिक्ट ३१३१)