Rotary Club of Pune Katraj
Back
एक सुंदर रमणीय संध्याकाळ, भेटून गेली ३५० वर्षांचा काळ, आसमंत “शिवसृष्टी”चा, शौर्याचा अन गौरवाचा
किल्ल्यांच्या कथांतून कळली रणनीती, समजला पराक्रम, सुराजी बाजी तानाजी, अशा वीरांच्या बलिदानाला आमचे नमन
मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा, रोटरी ऑफ पुणे काजत तर्फे शिवसृष्टीला खूप खूप शुभेच्छा!
निश्चयाचा महामेरू । बहुत जनसी आधारू । अखंडस्थितीचा निर्धार । श्रीमंत योगी।।
५ एप्रिल रोजी पुणे येथील आंबेगाव येथे साकारत असलेल्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्वप्नातील शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क आंबेगाव या संस्थेभेटी रोटरी क्लब ऑफ पुणे काजत व रोटरी इंडिया यांच्या वतीने उभारणी मी शिवदुर्ग आणि ऐतिहासिक थीम पार्क पूर्ण या सर्वांच्या सहकार्याने २८ लाख रुपये किमतीचे १२ सूर्य ऊर्जा पंप वाटप करण्यात आले.
शिवसृष्टी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेनुसार साकारल्या जाणाऱ्या ऐतिहासिक स्थळांचे छायाचित्रे शिवसृष्टीचे महाराज यांच्या जीवनावर आधारित सर्वात मोठ्या थीम पार्कला रोटरी क्लब आणि पुणे काजतच्या सेवा प्रकल्पाचे हस्तांतरण निमित्ताने आंबेगाव येथे भेट देण्याचा योग आला. बरसत्या ७० च्या जास्त समाजातील शिवसृष्टीच्या अनोखी अनुभव घेतला. ४०० वस्तूंची माहिती तयार करणे खूप मोठे जीवघेणे काम आहे, यामध्ये संकल्पना ते सिद्धीपर्यंत खूप मोठी समर्पित आहेत. ४३ एकरातील वातावरण अवलोकन आणि ४५० कोटी रुपये अंदाजित खर्च असलेल्या या प्रकल्पात आतापर्यंत सुमारे १४० कोटी रुपये खर्च झाले आणि २ फेज पूर्ण झाले आहेत. क्लबवर्ष २०२३ साली C R रंगनाथन शाखेतील मुकबधिर विद्यार्थ्यांनी या प्रकल्पाला भेट दिली होती, त्यावेळी फक्त फेज १ पूर्ण झाला होता. कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात सहकार्यालय च्या इमारतीमध्ये सभेने झाली. यामध्ये अध्यक्षांनी रोटरी क्लब आणि पुणे काजतच्या वतीने CSR फंडातून देण्यात आलेल्या पंपांचे हस्तांतरण केले. यामध्ये सर्व संबंधितांचे स्वागत करण्यात आले. शिवसृष्टीचे व्यवस्थापकीय अधिकारी मा. अनिल पवार सर, उप व्यवस्थापकीय अधिकारी मा. प्रमोद साळुंखे, रोटरी क्लब पुणे काजतचे अध्यक्ष अजय काळे सर, से. दिलीप पांडे सर, PP रो. प्रमोद गडकरी, रोटरीने इतर सदस्य व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या थीम पार्कमध्ये भवानी माता मंदिर, राजमाता जिजाऊ, बालशिवबा, नागरखाना, दरबार-स्वराज्य-स्वराज्यकथा, शिवअभिषेक स्तंभ अशा अनेक सुंदर देखाव्यांचे दर्शन घडवण्यात आले आहे. शिवरायांची विविध ड्रेसिंग प्रसिद्ध पेंटिंग, शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, शिवरायांच्या राजेशाही चित्र व कथा यांचे प्रदर्शन, किल्ले प्रतिकृती - देवगिरी दौलताबाद, शिवनेरी, राजगड, पन्हाळगड, विशाळगड, सिंधुदुर्ग व सिंहगड यांचे स्पर्श दर्शन झाले. किल्ल्यांची माहिती सांगताना निवेदकांनी देशील शिवरायांच्या व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कामगिरीचे प्रसंग अक्षरशः डोळ्यासमोर उभे केले. ही संध्याकाळ पुण्याच असूनही आम्ही काळ्या दगडात रममाण झाले होते. तीन तासांत प्रत्येक जण शिवकालात सफर करून आला. या कार्यक्रमाला शिवसृष्टी मधील कर्मचारी मनोभावे माहिती देत होते. आयुधगार, लष्कर राहणी आणि मनातील झुंजीत आणि छायाचित्रातून आठवणी जतन करण्याची संधी मिळाली.
शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप । शिवरायांचा आठवावा साक्षेप । सुभदंडी ।