Editor
Rtn. Shubhangi Mulay
May-2025
District Governor
Rtn. Shital Shah

रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती Back

सायकल डोनेशन प्रोजेक्ट, जिजाऊ वसतिगृह, काळेवाडी, कराड

खूप सुंदर अनुभव !!! एक व्यक्ती निस्वार्थीपणे अनाथ मुलांना आपल्याच हिमतीवर संभाळतो आहे. ज्याची बायको निस्वार्थीपणे म्हणते की आपल्याला कुठे वर घेऊन जायचं आहे काही. अशी ही जिजाऊ संस्था विविध ठिकाणी असलेल्या मुलांचे संगोपन करतीये आणी उत्तम संस्कार, शिक्षण आणि जे जे शक्य आहे ते सगळं देत आहेत. त्यांच्या या निस्वार्थी कार्याला अनेक जण आता पुढे होऊन मदत करत आहेत. रोटरी क्लब पुणे पर्वती ने आपले थोडे योगदान देऊन त्यांना सहकार्य केले. दिनांक २ मे रोजी मुलांसाठी नव्या कोर्या सायकल दिल्या. प्रेसिडेंट वृषाली, अशोक काळे आणि लीला ताई खैरे यांचा मोठा वाटा आहे. श्री. प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सायकली देण्यात आल्या.

रोटरी क्लब ऑफ सातारा आणि कराड तसेच अनेक सेवाभावी संस्थेच्या लोकांशी परिचय झाला की जे या संस्थेला मदत करत आहेत. खरंच एक सुंदर प्रोजेक्ट क्लब कडून झाला याचा अभिमान वाटतो.

प्रेसिडेंट वृषाली खिरे

रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती