चांदण्यांसारखं सौम्यपणे, लखलखणारं…
शांत संध्येसम, मनात उतरू पाहणारं…
पावसात भिजताना बालपण आठवणारं…
जगणं असं असावं…
एकांतात छान मोकळेपणानं गुणगुणणारं…
कधीतरी कवितेतून मोजकंच बोलणारं…
स्वतःसोबत इतरांनाही सामावून घेणारं…
जगणं असं असावं…
नाती, मैत्री मनापासून निभावणारं…
प्रेमात निखळ, निःस्वार्थ हास्य फुलवणारं…
कधी गर्दीत, तर कधी शांततेत हरवणारं…
जगणं असं असावं…
बघितलेल्या स्वप्नांवर विश्वास ठेवणारं…
प्रत्येक हरण्यात काहीतरी शिकवणारं…
मिळालेल्या यशात नम्रता जपणारं…
जगणं असं असावं…
आवडत्या क्षणी स्वच्छंद हसणारं…
दुःखद वेळी मनसोक्त रडणारं…
आप्तांसाठी हृदयद्वार उघडं ठेवणारं…
कारण…
जीवनाचं खरं सौंदर्य तर मनसोक्त जगण्यात असतं…
आपल्यामुळे कुणीही दुखावू नये, हे विसरायचं नसतं…
रो. हर्षदा बावनकर
रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज