Editor
Rtn. Shubhangi Mulay
January-2025
District Governor
Rtn. Shital Shah

व्होकेशनल सर्व्हिस अ‍ॅव्हेन्यू (Vocational Service Avenue) Back

व्होकेशनल सर्व्हिस अ‍ॅव्हेन्यू (Vocational Service      Avenue)

मित्रांनो, आपले रोटरीचे संस्थापक पॉल हॅरिस यांनी रोटरी सुरू केली ती मुळातच चार व्यावसायिक घेवून. आणि त्यामागचा उद्देश असा होता कि या चार लोकांनी एकमेकांना समजावून घ्यावं, त्यांच्या व्यवसायाची माहिती घ्यावी, तसेच हे सर्व करताना, एक दृढ मैत्रीभाव त्यांच्यात निर्माण व्हावा आणि एकमेकांची व्यावसायिक वाढही व्हावी.

याच विचाराने हा अ‍ॅव्हेन्यू सर्व क्लबमध्ये राबविला जावा, असं खरंतर अपेक्षित आहे आणि म्हणूनच पूर्वी एका क्लबमध्ये एक व्यवसायाशी निगडीत एकच व्यावसायिक मेंबर म्हणून घेतला जायचे. आपल्याकडे कुठले क्लासिफिकेशन खाली आहे याचा प्रामुख्याने विचार केला जायचा.

व्होकेशनस सर्व्हिसखाली तीन प्रकारच्या सर्व्हिसेस येतात-

१. व्होकेशनल ट्रेनिंग

२. व्होकेशनल व्हिजिट

३. व्होकेशनल अ‍ॅवॉर्ड

यावर्षी आमच्या कमिटीने एक नवीन संकल्पना राबविली ती म्हणजे व्यावसायिक ‘डे’ celebration आणि तेही क्लबबाहेरच्या मंडळींचे जेणेकरून रोटरीचा PI वाढेल आणि इतरांना रोटरी संस्थेबद्दल माहिती देता येईल. अशाप्रकारे चार्टर अकाउंटट, डॉक्टर, वकील, शिक्षक आणि इंजिनिअर डे सेलिब्रेट केले गेले. खूप क्लबजने यात उत्साहाने आपला सहभाग नोंदविला. शिक्षक दिन तर फार मोठ्या प्रमाणात साजरा झाला. सुमारे १५००च्यावर शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

इंडस्ट्रिअल व्हिजिटपण खूप क्लबजने केल्या. यामागचा मूळ उद्देश हा असतो की आपल्या ज्ञानात भर घालणे! आणि त्याच बरोबरीने क्लबमध्येही खेळीमेळीचे वातावरण राहते.

व्होकेशनल अ‍ॅवॉर्ड हा तर सर्वच क्लबच्या जिव्हाळ्याचा विषय. मला वाटतं service above self हा रोटरीचा मोटो या अ‍ॅव्हेन्यूमध्ये योग्यप्रकारे कार्यान्वित केला जातो. स्वत:पलिकडे जाऊन दुसर्‍यांच्या मदतीला जाणे आणि त्यांना त्यांच्या स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत करणे यासारखे महान सामाजिक कार्य दुसरे असूच शकत नाही. जी व्यक्ती अशा तर्‍हेचे कार्य करते, तिला असा सन्मान देऊन अधिकाधिक कार्य करण्यास प्रवृत्त करणे हा या मागचा उद्देश.

याच विचाराने तरुण उद्योजिका रचना रानडे हिला आपण रोटरी वर्षाच्या सुरुवातीलाच व्होकेशनल एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड देऊन सन्मानित केले. त्याचबरोबरीने अ‍ॅग्रिकल्चर विभागातील उल्लेखनीय काम करणारे श्री. संजय पाटील आणि तात्यासाहेब फडतरे यांनाही सन्मानित केले.

क्लब लेव्हलवर तर हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात राबविण्यात येतो.

व्होकेशनल ट्रेनिंग- यामध्ये हाच उद्देश आहे की गरजू लोकांना निरनिराळे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करणे. यामध्ये आपण प्रामुख्याने महिला आणि तरुणांना जास्त प्रोत्साहन देतो.

यावर्षी व्होकेशनल टिमने एक नवीनच उपक्रम राबविला. ग्रामीण भागातील नववीच्या मुलांची Aptitude Test (कल चाचणी ) घेण्यात आली. ज्यायोगे त्या मुलांचे पुढील भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होईल.

मित्रांनो, जानेवारी महिना हा व्होकेशनल मंथ म्हणून रोटरीने जाहीर केला आहे. मी सर्व रोटरी प्रेसिडेंसटना एकच विनंती करीन की, या तीन अ‍ॅव्हॅन्यूपैकी ज्या विभागाचे आपले काम अजून राहिले असेल ते आवर्जून या महिन्यात पूर्ण करा.

व्होकेशनल किंवा व्यावसायिक हा रोटरीचा पूर्णपणे प्रोफेशनल भाग आहे, ज्या अन्वये समाजातील आर्थिक दुर्बलता कमी करून सन्मानाने सामान्य माणसास जगण्यास प्रवृत्त करता येईल.

आमची व्होकेशनल टीम तुम्हाला यासाठी जे लागेल ते सहकार्य करण्यास तयार आहे.

 रो.मधुमिता बर्वे

(
डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर २४-२५ )