Editor
Rtn. Shubhangi Mulay
June-2025
District Governor
Rtn. Shital Shah

रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेन Back
रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेन

अध्यक्ष २४ - २५ : रो. अमोल कापसे

क्लबची माहिती :-

रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेन यांनी एकाच दिवसांमध्ये २४७० पिशव्या रक्तदान शिबिर आयोजित करून प्राप्त केल्या आणि स्वतःच एक मोठा रेकॉर्ड तयार केलं, शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या सोबत आळेफाटा येथे भव्य मोतीबिंदूचे शिबिर आयोजित करून १५० पेशंटूस पनवेल येथे ऑपरेशन साठी नेले होते. त्यांना संपूर्ण ट्रीटमेंट व चष्मे, औषधं विनामूल्य पुरविले होते. ज्ञान मंदिर हायस्कूल आळे या ठिकाणी भव्य सर्व रोग निदान शिबिर आयोजित करून जवळपास ३०० पेशंट्स वेगवेगळ्या ऑपरेशन साठी मेडिकल कॉलेज प्रवरानगर या ठिकाणी पाठवले होते. दरवर्षी कमीत कमी १००० झाडांचे वृक्षारोपण व संगोपन क्लब तर्फे करण्यात येते. आदिवासी भागातील गरीब होतकरूंना पदग्रहणाचा खर्च टाळून ३०० गरजूंना ब्लॅंकेटचे वाटप केले आहे. आळेफाटा येथे सहा किलोमीटरची भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. प्राथमिक आरोग्य केंद्र आळे या ठिकाणी अपंग व्यक्तींना व्हीलचेअर वाटप करण्यात आले. तसेच याच ठिकाणी बेबी वॉर्मर सुद्धा देण्यात आले. ज्ञानमंदिर हायस्कूल आळे या ठिकाणी टॉयलेट ब्लॉक बांधून देण्यात आले. क्लब तर्फे कांदा मार्केट आळेफाटा या ठिकाणी भव्य कराटे स्पर्धा नानजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेल्या आहेत. क्लबतर्फे आंबी दुमाला येथील शाळेत वॉटर प्युरिफायर देण्यात आले. मराठी पूर्व माध्यमिक शाळा आळेफाटा या ठिकाणी ई लर्निंगच्या संचाचे वाटप करण्यात आले. क्लबतर्फे दहा शाळांना स्मार्ट टीव्हीचे वाटप झालेले आहे. डॉक्टर्स डे निमित्त तालुक्यातील १५० डॉक्टर्स एकाच ठिकाणी बोलावून गेट-टुगेदर करून सर्वांना पुष्पगुच्छ देऊन व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेन, रोटरी क्लब नारायणगाव हायवे, रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या सोबत २०० विद्यार्थ्यांचा शिवनेरी किल्ल्यावर RYLA घेण्यात आला. क्लब तर्फे आळेफाटा या ठिकाणी कार्तिकी यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंचे स्वागत करून त्यांना नाश्ता व चहा बिस्किटे देण्यात आली. रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेन तसेच रोटरी क्लब नारायणगाव व नारायणगाव हायवे, रोटरी क्लब ऑफ शिवनेरी जुन्नर यांच्या सोबत तालुकास्तरीय भव्य रोगनिदान शिबिर व वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन चैतन्य हॉस्पिटल आळेफाटा या ठिकाणी घेण्यात आले. ग्लोबल ग्रँट प्रोजेक्ट मधून प्राथमिक आरोग्य केंद्र निरगुडसर व (ओतूर )मढ या ठिकाणी वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.