रोटरी क्लब पुणे मिडटाऊन
Back
रोटरी क्लब पुणे मिडटाऊनच्या ग्लोबल-ग्रांट प्रोजेक्टचे योगदान (Grant ID: #2460298)
ग्लोबल ग्रांट प्रोजेक्ट अंतर्गत, रोटरी क्लब पुणे मिडटाऊन तर्फे ताराचंद हॉस्पिटल, पुणे येथे डोळ्यांच्या विविध आजारांचे निदान आणि शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे ($68,000 / ₹55 लाख) किंमतीची भेट म्हणून देण्यात आली. सेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल आयुर्वेदिक हॉस्पिटल ट्रस्ट मधील नेत्रचिकित्सा विभागाचे आधुनिकीकरण आणि विस्तार करण्यासाठी राबवण्यात आला आहे. रोटरी इंटरनॅशनल ग्लोबल ग्रांट कार्यक्रमाअंतर्गत रोग प्रतिबंध आणि उपचार हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
प्रायोजक क्लब्स : भारत (होस्ट क्लब): रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊन, Dist 3131
अमेरिका (आंतरराष्ट्रीय क्लब): लेक बुएना व्हिस्टा
सहायक क्लब्स भारत:
1. पुणे पाषाण 2. पुणे वेस्ट 3. पुणे गांधी भवन 4. पुणे शनिवारवाडा 5. पुणे फिनिक्स
अमेरिका: 1. रोटरी क्लब ऑफ किसिमी वेस्ट 2. रोटरी क्लब ऑफ लेक नोना
3. रोटरी क्लब ऑफ ऑरेंज काउंटी ईस्ट WP 4. रोटरी क्लब ऑफ सॅनफोर्ड
5. रोटरी क्लब ऑफ द पार्क्स-ऑर्लॅंडो 6. रोटरी क्लब ऑफ सांतामोनिका
या सर्व सुविधा दि 4 मार्च 2025 रोजी एका विशेष उद्घाटन समारंभात लोकार्पण करण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर-इलेक्ट रो. संतोष मराठे होते. तसेच ताराचंद हॉस्पिटलचे ट्रस्टी श्री. गोपालजी राठी, रोटरी क्लब ऑफ पुणे मिडटाऊनचे प्रेसिडेंट अभिजीत म्हसकर, सेक्रेटरी भालचंद्र दरेकर, पास्ट प्रेसिडेंट मीनल अवचट, आणि प्रोजेक्ट डायरेक्टर सचिन देशपांडे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन PP सुनील हिंगमिरे यांनी केले.
प्रेसिडेंट रो. अभिजीत म्हसकर यांनी रोटरी क्लबच्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली.
पास्ट प्रेसिडेंट रो. मीनल अवचट यांनी हा प्रकल्प कसा सुरू झाला, तसेच रो. सचिन देशपांडे यांनी ताराचंद हॉस्पिटलसाठी दिलेल्या वैद्यकीय उपकरणांची सविस्तर माहिती दिली.
श्री. राठी (ट्रस्टी, ताराचंद हॉस्पिटल) यांनी हॉस्पिटलच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत समाजातील दानशूर व्यक्तींनी कशी मदत केली यावर प्रकाश टाकला. त्यांनी गेल्या ५ वर्षांपासून रोटरी क्लबने दिलेल्या सहकार्याचे विशेष कौतुक केले.
निरामय संस्थेच्या प्रोजेक्ट हेड यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. त्यांनी आंगणवाडी कार्यकर्त्यांना शिक्षण देण्यापासून रोग प्रतिबंधक उपाय शिकवण्यापर्यंतच्या कार्याचा विस्तार कसा झाला हे सांगितले. तसेच, रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊनने त्यांना विविध प्रकल्पांमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
प्रमुख पाहुणे रो. संतोष मराठे यांनी या संपूर्ण प्रकल्पाबद्दल समाधान व्यक्त केले आणि भविष्यातही सर्व रोटरी क्लबनी समाजाच्या कल्याणासाठी कार्य करावे, अशी इच्छा व्यक्त केली.
या समारंभाला रोटरी क्लबचे अनेक सदस्य, सिनर्जी पार्टनर क्लबचे प्रेसिडेंट, निरामय संस्थेचे प्रोजेक्ट हेड, मित्रपरिवार आणि हॉस्पिटल स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते.