अभिनय आणि सादरीकरण हा प्रकार लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना आवडणारा. चार लोकांसमोर उभं राहून आपण काहीतरी करावं, सर्वांचं लक्ष आपल्याकडे असावं इतकंच नाही तर आपण जे काही सादर करू ते झालं की टाळ्या आणि कौतुक मिळावं ही अनेकांची मनीषा.. व हीच मनीषा नाट्यछटा स्पर्धेच्या रूपाने रोटरी क्लब ऑफ फिनिक्सने १८ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित केली. प्रतिसादही खूप उत्तम मिळाला. अगदी पाच वर्षांपासून पन्नास वर्षांपर्यंत अशा ७५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. ही स्पर्धा हिरे हायस्कूल पर्वती येथे आयोजित केली होती. सर्व वयोगटातील स्पर्धकांनी आपले गुण सादर करून ही स्पर्धा उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवली व त्यावर कळस चढवीला प्रेसिडेंट विनय कुमठेकर, प्रमुख अतिथी अभिनेत्री भाग्यश्री देसाई, कल्चरल डायरेक्टर वैशाली वर्णेकर, परीक्षक देवेंद्र भिडे आणि रेणुका भिडे यांच्या सुंदर भाषणाने व बक्षीस समारंभाने...
नाट्यछटा स्पर्धेचं हे तिसरं वर्ष असून आम्ही सर्व फिनिक्स क्लब मेंबर्स हा वारसा पुढे चालवू आणि हा कलाविष्कार जपण्याचा प्रयत्न करू.
रो.स्वाती कुमठेकर
रोटरी क्लब ऑफ पुणे फिनिक्स