सांगावे असे खूप आहे,
पण सांगता येत नाही;
यत्न खूप केले पण,
जीभ कधी रेटली नाही l
नजरेने बोललेले,
कोणा कधी कळले नाही;
शब्दांची फुले कधीही,
जीवनात फुलली नाही l
भावनांचे धूमकेतू,
अवकाशात विरुनी गेले;
मनातले सल सारे,
कृष्णविवर बनुनी गेले l
माझ्या अश्रूंची भाषा,
कोणास उमजलीच नाही;
सुकले गालावर तसेच,
ते ही माझे झाले नाही l
रो. मंजिरी शहाणे
रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटी