रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वतीचा मूकबधिर शाळेसाठी इंटरॅक्ट क्लब
१७ डिसेंबरच्या दुपारी हॉल अतिशय उत्सुकतेने गजबजलेला होता. निमित्त होते रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती स्थापन करीत असलेल्या इंटरॅक्ट क्लब ऑफ पुणे पर्वतीचे!
प्रमुख पाहुण्यांच्या चार युक्तीच्या गोष्टी ऐकण्यासाठी क्वचितच दिसणारी उस्तुकता इथे मात्र प्रकर्षाने दिसली; सर्वांनी अगदी मनापासून त्यांची कर्तृत्व गाथा ऐकली , त्याचे वेगळे आणि एकमेव कारण म्हणजे हे भाषण संपूर्णपणे sign language मध्ये ( म्हणजे खाणा खुणांच्या ) भाषेत झाले!
हॉल मध्ये प्रचंड ऊर्जास्त्रोत पण पिन ड्रॉप शांतता , फक्त बाहेरच्या पानांचा सळसळण्याचा काय तो आवाज !
हा मूकबधिर शाळेसाठी पहिला इंटरॅक्ट क्लब स्थापन करण्याचा ऐतिहासिक अभूतपूर्व उपक्रम आहे रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वतीचा!
बॅडमिंटन प्लेयर , बास्केटबॉल कोच आणि इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित व्यावसायिक, मूळचे मूकबधिर असलेले प्रमुख पाहुणे श्री. मिलींद साठे यांनी या मुलांच्या मर्यादित संधी आणि त्यावरील उपायांबद्दल त्यांच्याच म्हणजे विशेष मुलांच्या भाषेत संवाद साधला आणि सर्व उपस्थितांना प्रेरित करून त्यांची मने जिंकली!
हा क्लब म्हणजे रोटरीच्या इतिहासातील मैलाचा दगड म्हणता येईल.
समुद्रसपाटीपासून 2000 फूट उंचीची पर्वती टेकडी हा पुण्याच्या मानाचा ठेवा आहे! त्यातून स्फूर्ती घेऊन रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वतीने आपला मान आणि प्रतिष्ठा उंचावलेली आहे असे नक्कीच म्हणता येईल!
ॲन अनिता मराठे
रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती