Rotary Club of Pune Royal
Back
महिलांसाठी “गृहिणी ते उद्योजिका” कार्यशाळा
रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयल च्या वतीने महिलांसाठी “गृहिणी ते उद्योजिका” ही एक विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती आणि ती अत्यंत यशस्वीरीत्या पार पडली.
Rotary District 3131 च्या Economic and Community Development Team मधील मान्यवर उपस्थित होते:
- रो. आनंद कुलकर्णी
- रो. सरिता बल्लाळ
- रो. राजश्री भुजबळ
- CA रो. गजानन मुंगल
या सर्वांनी interactive पद्धतीने महिलांना अत्यंत सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत व्यवसाय कसा सुरू करायचा, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडियाचा प्रभावी वापर, GST संबंधित माहिती तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
सर्व महिलांनी या सत्रांचा मनापासून आनंद घेतला.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यामध्ये श्री. कुणाल आबा वेडेपाटील यांचा मोलाचा वाटा आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार 🙏
तसेच रो. वैशाली वेडेपाटील हिने या कार्यक्रमासाठी अतिशय मेहनत घेतली. गेल्या १५ दिवसांपासून ती बचत गटांशी सतत संपर्कात होती. फ्लेक्स लावणे, हॉल बुकिंग, इतर सर्व व्यवस्था तसेच सहभागींसाठी अल्पोपहाराची सोय करणे या सर्व जबाबदाऱ्या तिने उत्तम प्रकारे पार पाडल्या. त्याबद्दल तिचे मनःपूर्वक आभार 🙏
रो. दीप्ती कुलकर्णी हिने उत्कृष्ट सूत्रसंचालन केले, त्याबद्दल तिचे आभार 🙏
रो. वृषाली देशपांडे हिने अतिशय सुंदर आभार प्रदर्शन केले, त्याबद्दल तिचे आभार 🙏
सेक्रेटरी रो. नीलिमा यादव उपस्थित होत्या, त्याबद्दल त्यांचे आभार 🙏
या प्रसंगी रो. उदय कुलकर्णी आणि रो. गिरीश देशपांडे उपस्थित होते, त्याबद्दल त्यांचेही आभार 🙏
या कार्यशाळेचा सुमारे ६० महिलांनी लाभ घेतला
#rcproyal #rotarypuneroyal #rid3131 #dgsantoshmarathe #rotarywomenempowerment
*महिलांसाठी “गृहिणी ते उद्योजिका” कार्यशाळा*
*रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयल* च्या वतीने महिलांसाठी *“गृहिणी ते उद्योजिका”* ही एक विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती आणि ती अत्यंत यशस्वीरीत्या पार पडली.
*Rotary District 3131* च्या *Economic and Community Development Team* मधील मान्यवर उपस्थित होते:
- *रो. आनंद कुलकर्णी (RCP Wisdom)*
- *रो. सरिता बल्लाळ (RCP Wisdom)*
- *रो. राजश्री भुजबळ (RCP Sanskruti)*
- *रो. गजानन मुंगल (RCP Wisdom)*
*रो. आनंद कुलकर्णी* यांनी व्यवसाय व्यवस्थापन अगदी सोप्या आणि व्यवहार्य पद्धतीने उलगडून सांगितले — त्यांच्या मार्गदर्शनाने व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला.
*रो. राजश्री भुजबळ* यांनी मार्केटिंग, सोशल मीडिया व डिजिटल स्ट्रॅटेजीजवर प्रभावी मार्गदर्शन केले — आजच्या काळात व्यवसाय वाढीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण दिशा दिली.
*रो. गजानन मुंगल* यांनी आर्थिक नियोजन व कायदेशीर बाबींवर दिलेली सखोल आणि स्पष्ट माहिती सहभागींसाठी अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरली.
*रो. सरिता बल्लाळ* यांनी सर्व प्रशिक्षकांना समर्थ साथ देत, संपूर्ण सत्र सुरळीत पार पडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली — तसेच महिलांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा देत, त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची ताकद दिली.
या सर्वांनी interactive पद्धतीने महिलांना अत्यंत सविस्तर मार्गदर्शन केले. सर्व महिलांनी या सत्रांचा मनापासून आनंद घेतला.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यामध्ये *श्री. कुणालआबा वेडेपाटील* यांचा मोलाचा वाटा होता त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार 🙏
तसेच *रो. वैशाली वेडेपाटील* हिने या कार्यक्रमासाठी अतिशय मेहनत घेतली. गेल्या १५ दिवसांपासून ती बचत गटांशी सतत संपर्कात होती. फ्लेक्स लावणे, हॉल बुकिंग, इतर सर्व व्यवस्था तसेच सहभागींसाठी अल्पोपहाराची सोय करणे या सर्व जबाबदाऱ्या तिने उत्तम प्रकारे पार पाडल्या. त्याबद्दल तिचे मनःपूर्वक आभार 🙏
*रो. दीप्ती कुलकर्णी* हिने उत्कृष्ट सूत्रसंचालन केले, त्याबद्दल तिचे आभार 🙏
*रो. वृषाली देशपांडे* हिने अतिशय सुंदर आभार प्रदर्शन केले, त्याबद्दल तिचे आभार 🙏
*सेक्रेटरी रो. नीलिमा यादव* उपस्थित होती, त्याबद्दल तिचे आभार 🙏
या प्रसंगी *रो. उदय कुलकर्णी* आणि *रो. गिरीश देशपांडे* उपस्थित होते, त्याबद्दल त्यांचेही आभार 🙏
या कार्यशाळेचा सुमारे *६० महिलांनी लाभ घेतला*