District Governor - Rtn. Manjoo Phadke
Nov-2023
Editor - Rtn. Madhur Dolare

Poem by Ann Sonali Sirsikar Back

आली माझ्या घरी एक सुंदर परी

पहाटेच्या गोड स्वप्नातल्या परी सारखी

आली माझ्या घरी एक सुंदर परी

 

गुलाबी गालाची

इवल्याश्या डोळ्यांची

शांत स्वभावाची

 

एक परदेशी परी

आली माझ्या दारी

 

आमच्या चौकोनी कुटुंबांत

एक फुलली पाचवी कळी

सांगावे लागत नाही तिला

काहिच कोणत्याच वेळी

 

निरागस मनाची

गोड आवाजाची

समंजस स्वभावाची

एक छोटीशी बाळी

 

माझ्या मुलीची तर

झालीय ती लाडकी सखी

वाटतच नाहिये ती

आम्हाला अनोळखी

 

रोटरीमुळे मिळाली

आम्हाला एक लाडकी लेक

युथ एक्सचेंजचा विचारच आहे

हा खुप नेक

 

धन्यवाद त्या वाघांना ज्यांच्यामुळे

आली आमच्या घरी मारियाना.

आणि नंतर येणार आहे योवाना

 

- ॲन सोनाली जितेंद्र सिरसीकर

रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर