EX RI Director-RTN.Mahesh Kotbagi Back

मित्रांनो ,

बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात.

पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते, असं बासरी तयार करणारे सांगतात.

त्याचं कारण म्हणजे या तिथींमध्ये शेवटी ' मी ' येतो. याच ' मीपणाच्या ' अहंकारातून कार्यनाश होतो आणि बासरी टिकत नाही, असा समज आहे.

अशाच मीपणाचा लवलेशही नसणा-या डीजी संतोषला मनापासून शुभेच्छा

संपूर्ण जगात रोटरीची सदस्य संख्या कमी होत असताना दक्षिण आशियातील सदस्यत्व दरवर्षी वाढते आहे व त्यात ३१३१ चा वाटा फार महत्वाचा असतो. वाढते शहरीकरण व सुबत्ता हे या वाढीचे मुख्य कारण. ३१३१ मधील असे अनेक ग्रहप्रकल्प आहेत जिथे आपण पोचलो नाही , याचा नीट अभ्यास करून नवीन क्लब कसे निर्माण करता येतील हे पाहणे महत्वाचे ठरेल.

रोटरी फाऊंडेशन मधील आपले योगदान दरवर्षी वाढते आहे ही प्रेरणा यावर्षी पण चालू राहिल ही खात्री मला आहेच पण भारत हा आता जगातील चौथी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला आहे, हे लक्षात घेऊन आपण आता दात्रुत्वाची भुमिका घेतली पाहीजे.

३१३१ ने तीनवर्षापूर्वी आपल्या आंतरराष्ट्रीय संचालकमंडलावर एक निर्विवाद झाप पाडली आहे हा वारसा पुढे नेण्यासाठी एक प्रयत्नपूर्वक योजना आखली गेली पाहिजे.
रोटरी क्लब पुना वेस्टला फार मोठी परंपरा आहे . अनेक क्लबचे पित्रुत्व त्यांनी यशस्वीपणे पार पाडले आहे. माझा क्लब ( पुणे स्पोर्ट सिटी) ही त्यांचीच निर्मिती. कल्याण वर्दे , सतिश कौशिक , मुकुंदराव अभ्यंकर असे अनेक नेते त्यांनी ३१३१ ला दीले आहेत व चारूच्या रूपात एक नवे नेत्रुत्व ते देणार आहेत .

सर्वात महत्वाचे म्हणजे कार्येषु मंत्री म्हणून समर्थपणे मागे उभी राहणारी तनुजा संतोषबरोबर आहे .

आणि म्हणूनच हे शक्य होईल जरूर होईल .

कारण कवी बा भ बोरकर म्हणतात:

सुंदर ते हात तया निर्मितीचे डोहाळे

अशा निर्मितीचे डोहाळे असणारे असंख्य हात आपल्याकडे आहेत त्याचा पारदर्शक यंत्रणेतून वापर करण्याचे कौशल्य संतोषकडे निर्विवादपणे आहे . त्याला लक्षलक्ष शुभेच्छा 

DR Mahesh Kotbagi
EX Director Rotary International