District Governor - Rtn. Manjoo Phadke
Mar-2024
Editor - Rtn. Madhur Dolare

आमची डीजी मंजू Back
प्रांतपालांची क्लबची भेट हा सालाना कार्यक्रम नेमाचा, अध्यक्ष आणि त्यांच्या संचालकांच्या सत्वर लगबगीचा|

रोटरी प्रांत ३१३१ च्या कळसावर आहे एक चांदणी, नाव तिचे मंजू जी आहे रोटेरिअन विश्वासची सहचारिणी|

सांप्रत रोटरी वर्षाच्या त्या आहेत मुख्यमंत्री, रोटरीतील कामांची आहे मात्र मोठीच जंत्री|

वाणीवर ठेवले आहे मंजूने साखरी प्रभुत्व, सर्वदूर पसरले तिचे चतुरस्त्र व्यक्तिमत्व|

शिक्षण विद्वत्ता बुद्धिमत्ता सर्वांचा सुरेख संगम, व्यावसायिक प्रशिक्षण देऊन केले बरेच सक्षम|

नवनवीन कल्पना राबवण्याची तिला खूप आवड, अथक दबडग्यातून मंजूला मात्र भरपूर सवड|

उदयन गुरु विवान ध्रुवम साकारी नूतन उपक्रमा, नक्षत्र कक्षा तेजोनिधी आणि तारांगणाची परिक्रमा|

विविध स्तरीय क्रीडांमध्ये तिचा आहे हातखंडा, गिर्यारोहण व कार रॅलीत मंजूचा वेगळाच फंडा|

पद्मश्री धारक आहेत द्रोणाचार्य गोपाळराव श्वशुर, कथ्थक नर्तिका लेक ईशा आहे सर्वत्र मशहूर|

तबला विशारद असतात त्यांचे जावई अंबर, अंतरा नातीचे कुटुंबात सदैव चैतन्यरुपी झुंबर|

रोटरी महागुरू बेस्ट एजी आदी पुरस्कार मिळवून मानाचे, रणरागिणी मंजूसमवेत आजचे मंथन क्लबच्या महत भाग्याचे|

रो. वर्षा हिरवे
रोटरी क्लब ॲाफ पुणे कात्रज