Rotary Club of Belmondo, Gahunje Back
In the month of April 2026, we did a synergy project (Project name is DREAM SCHOOL) with RCP Sinhgad Road. One of our club's senior rotarians Rtn Shyam Sirur Ji donated Rs 2 Lakhs as part of CSR (COTMAC Electronics Pvt Ltd) for this project.

आपल्या संस्कृतीप्रमाणे मंदिराच्या पायाभरणीपासून मंदिराच्या कळसापर्यंत लागणारे सर्वच हात कृतज्ञतेस सार्थ ठरतात.
रोटरी क्लब ऑफ सिंहगड रोड, पुणेचे सन्माननीय सदस्य आदरणीय श्री. दारव्हेकर सर यांच्या संकल्पनेतून ड्रीम स्कूल आर्वीच्या २७ सप्टेंबर २०२४ पासून सुरु झालेल्या प्रवासाची यशस्वी वाटचाल. सोबतीला रोटरी क्लब ऑफ सिंहगड रोडचे सन्माननीय सदस्य श्री अभय देवरे सर व रोटरी क्लब ऑफ बेलमेंडो गहुंजे चे सन्माननीय सदस्य श्री दिनेश दिक्षित व श्री विवेक जामदार होते. तब्बल दोन लाख रुपये आर्थिक निधी देऊन स्किल लॅब उभारणीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे कॉटमॅक इलेक्ट्रॉनिक्स यांचे मानावे तितके आभार कमीच आहेत. स्वामी समर्थ प्रकटदिनाच्या शुभ मुहूर्तावर स्किल लॅब मध्ये अतिशय दर्जेदार असे साहित्य देताना चैतन्य सॉफ्टवेअर फौंडेशन कडून श्री. व सौ. देशपांडे यांची निर्मितीची झालर मिळाली. या साहित्याच्या माध्यमातून अगदी वेळेपूर्वी येऊन  विद्यार्थ्यांपर्यंत सहजतेने ज्ञान देण्याचे  कार्य श्री. विष्णु नराम सर व त्यांचे सहकारी श्री. संकेत जाधव सर करत आहेत. आर्वी शाळेत ही लॅब होत असताना अंतर्गत सुविधा प्राप्त करून देणे क्रमप्राप्त होते . यासाठी ग्रामपंचायत आर्वी सरपंच श्री. सागरतात्या नवघणे , शाळा व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष श्री. गणेशदादा नवघणे ,  माजी उपसरपंच व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. सागरदादा घोगरे, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष तसेच माजी विद्यार्थी संघ समितीचे विद्यमान अध्यक्ष श्री. विष्णू आबा घोगरे यांचेही योगदान लाभले . आर्वी शाळेच्या तत्कालीन मुख्याध्यापिका श्रीमती रिमा बेल्हे व पदवीधर शिक्षक श्री.अनिल मुजुमले सर यांनी प्रशासकीय बाबींची पूर्तता, माहिती संकलन कार्य तत्परतेने केले. हाच वारसा पुढे चालू ठेवण्याचे काम प्रभारी मुख्याध्यापिका सौ. अव्दिता चांदोरकर मॅडम व शिक्षकवृंद करत आहेत . दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी स्किल लॅब उद्घाटन व शाळार्पण सोहळ्यास वरील सर्व मान्यवर, श्री. प्रसन्न देशमुख सर (ऑक्सफर्ड स्कूल) , श्री. अपशंकर सर (स्टडक्राफ्ट कंपनी ), आर्वी - रांजे भागातील उद्योजक , श्री. संदिप घोगरे ( पोलीस पाटील आर्वी ), श्री. नाना घोगरे ( ज्येष्ठ ग्रामस्थ आर्वी ), पालक वर्ग यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली . आपल्या आर्वी शाळेतील ही स्किल लॅब सर्वांच्या मदतीने आणखी अद्ययावत - सुंदर करून विद्यार्थी कौशल्य विकसनासाठी पर्यायाने शालेय गुणवत्ता वाढीसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल . अशा महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद ! 
                    शब्दांकन
              सुवर्णा पंडू पवार    
      उपशिक्षिका, जिल्हा परिषद  
      प्राथमिक शाळा आर्वी तथा  
        राज्य अभ्यासगट समिती  
        सदस्य, बालभारती पुणे
 
 
Thanks,
Rtn Vivek Jamdar
IPP, RC Belmondo, Gahunje
 
 
Youtube link is as follows :- 
https://youtube.com/shorts/PZoZiaUQ29Y?feature=share