स्वानंद गीत Back

सहवासातुन विश्वासाची

वीण घट्ट ती विणली जावी,

घेऊन हाती हात, मुखाने,

प्रेमाची गाणी म्हणली जावी!

 

संपुन जावा नकोनकोसा,

नात्यांमधला दीर्घ दुरावा,

होऊन जावे सारे मधुरम

कटूपणा ना मनी उरावा!

 

प्राशुनी अप्रिय शब्दां आपण,

स्वानंदे सकलां भिजवावे,

मधुबोलांनी आपण आपुल्या,

सकल जनाते ते रिझवावे!

 

किती कुणाचे जगणे बाकी,

कुणालाचि हॊ ना ठावे  ,

हाती उरल्या गोड क्षणांचे

 म्हणुनीसुंदर गीतची व्हावे!

 

रो.जयश्री कुबेर

रोटरी क्लब ऑफ पूना

झोनल चेअर, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल सर्विस कमिटी