रोटरी वर्ष २४ - २५ चा श्रीगणेशा
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या नवीन वर्षाची सुरुवात डिस्ट्रिक्टचे डी.जी. रो.शितल शहा व फर्स्ट लेडी रो.रागिणी शहा यांच्या हस्ते सारसबाग गणपती मंदिरात आरती करून झाली.
यावेळी डिस्ट्रिक्ट लर्निंग फॅसिलिटेटर पीडीजी रो.पंकज शहा , डिस्ट्रिक्टचे विविध पदाधिकारी , अनेक क्लबसचे प्रेसिडेंट्स व त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. श्रींच्या आरतीच्या आधी सामूहिक अथर्वशीर्ष पठण झाले.
कार्यक्रमानंतर श्रीमंत पेशवे हॉल येथे तुळशीबागवाले भगिनींनी कथक व भरतनाट्यम शैलीत गणेश वंदना सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
कार्यक्रमानंतर प्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.
डिस्ट्रिक्ट कल्चरल डायरेक्टर रो. वैशाली वर्णेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर डिस्ट्रिक्ट कल्चरल कोडायरेक्टर रो. मोहन टिल्लू यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन केले.
रो.मोहन टिल्लू
डिस्ट्रिक्ट कल्चरल कोडायरेक्टर २४ - २५