Highlights & Review of District Events: District Cultural Programs Back

 1 जुलै  रोजी  श्रीमंत दगडू हलवाई  येथे श्री गणेशाची आरती डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. संतोष मराठे आणि फर्स्ट लेडी तनुजा यांच्या हस्ते करण्यात आली व रोटरी वर्षाची सुरवात  मंगलमय वातावरणात झाली.


6 जुलै रोजी DG संतोष मराठे यांच्या पदग्रहण कार्यक्रमात कल्चरल कमिटीने पारंपरिक संबळ वादन आयोजित केले होते.ज्याची सर्वांनी खूप प्रशंसा केली.

31जुलै  रोजी सायंकाळी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे मोगरा फुलला या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रसिद्ध व्याख्याते श्री गणेश शिंदे व सुरेल गळ्याची गायिका सन्मिता धापटे शिंदे यांचा हा कार्यक्रम अतिशय संस्मरणीय असा झाला.संत साहित्य या त्यांच्या संगीत रचना यांवर आधारित हा कार्यक्रम सर्वांना खूप भावला. 
नाट्यगृह अगदी शेवटपर्यंत पूर्ण भरलेले होते. सर्वानी मुक्तकंठाने कार्यक्रमाची प्रशंसा केली. 20 क्लब ची सिनर्जी व कॅनराबँक ,IDFC Bank ढेपेवाडा,IFRM, समर्थ Logistics आणि डिस्ट्रिक्ट ऑफिस या सर्वांच्या आर्थिक सहकाऱ्याने हा कार्यक्रम संपन्न झाला. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संतोषजी व फर्स्ट लेडी तनुजा यांनी संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेतला. प्रा राम मोरे या कार्यक्रमात प्रमुख अतिथी या नात्याने उपस्थित होते. PDG मोहन पालेशा, DRFC पंकज शहा आदि रोटरी ऑफिसर्स उपस्थित होते. रोटरीतील जवळ जवळ 900 रसिकांची उपस्थिती येथे दिसून आली.

ऑगस्ट महिन्यातील गणेशोत्सवात अथर्वशीर्ष पठण सारसबाग येथे 3 सप्टेंबर रोजी होणार आहे.

पुणे फेस्टिव्हलमध्ये रोटरीचे इंद्रधनू हा नृत्य व संगीताचा 
बहारदार कार्यक्रम 4 सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. रोटरी मधील उत्तम गायक गायिका हा कार्यक्रम सादर करणार आहेत.

याचबरोबर Cultural Committee कडून 
फोटोग्राफी स्पर्धेचे ही आयोजन केलेले आहे. ही स्पर्धा सध्या चालू आहे व दिवाळीत फोटोचे प्रदर्शन असेल.वर्षभर अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम करण्याचे नियोजन कल्चरल कमिटीने केलेले आहे.

Rtn.Snehal Bhat 
Director 25-26
District 3131 Cultural Comitee.