Testimonials By Rotary Club of Pune Royal Back
Dementia या विषयावर झालेला कार्यक्रम माहितीपर होता. मुख्य म्हणजे मेंदूसाठी जे व्यायाम शिकविले ते उपयुक्त आहेत. केंद्रावर आपण केले पाहिजेत. टेस्टमधे चांगले गुण मिळाल्याने मनोबल वाढले. रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयल असे उपक्रम राबवतात आणि स्नेहधाम मुळे आम्ही लाभ घेऊ शकतो . -- जयप्रभा परदेशी

रोटरी क्लब नेहमीच असे विविध  समाजोपयोगी उपक्रम राबवत असतातस्नेहधाममुळे ते आम्हा सर्वांना पर्यंत पोचले, brain, dementia बद्दल महत्त्वाची माहिती मिळाली, होऊ नये म्हणून उपाय योजना आहार इत्यादी छान समजले. रोटरी प्रेसिडेंट मेधा कुलकर्णी आणि रिध्दी जगदाळे ताई यांना मनापासून धन्यवाद -- अर्चना ताडफळे

स्नेहधाम येथे झालेला रोटरी क्लब ने आयोजित केलेला कार्यक्रम खूपच उपयुक्त होता. मेंदूसाठी व्यायाम असतात ही संकल्पना समजली. आता रोज सर्व करण्यासाठी एकमेकांना आग्रह करूयात, आठवण करूयात म्हणजे सर्वांचे आरोग्य व्यवस्थित राहिल  -- अपर्णा हळदुले

रोटरी ऑफ पुणे रॉयलचा कार्यक्रम अगदी व्यवस्थित झाला. उपयुक्त सोपी माहिती, रोगाची माहिती, योग्य व्यायाम करवून त्यासंबंधी सर्व  माहिती, एकावेळी 3/3 जणांची परीक्षा घेऊन योग्य मार्गदर्शन  केलेरोटरी क्लब प्रेसिडेंट मेधा कुलकर्णी आणि रिध्दी जगदाळे ताई यांना अनेक धन्यवाद -- नीलिन परांजपे