रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने वनराई बंधारे मोहीम पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यात व रायगड जिल्ह्यात सुरु झाली. अवघ्या ६० दिवसात आज दिनांक ०१ डिसेंबर २०२३ शुक्रवार (ग्रीन फ्रायडे) पर्यंत एकूण ११४७ वनराई बंधारे पुणे जिल्ह्यात व २०० वनराई बंधारे रायगड जिल्ह्यात बांधण्यात आले. हे पाणी जमीनीत बंधाऱ्यांच्या साहाय्याने मुरवून शेतीसाठी वापरता येणार आहे व जनावराना देखील पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे. अशारीतीने एकूण १००० हेक्टर खेत्राला सिंचन उपलब्ध होणार आहे.
१ बंधारा १ घनमीटर पाणी अडवतो. साधारणपणे आपण एकूण पुणे जिल्ह्यात ११४७ व रायगड जिल्ह्यात २०० बंधारे बांधले.
म्हणजे एकूण १.३ सहस्र घनमीटर पाणी अडवले. आजच्या दुष्काळ सदृश परिस्थितीत रोटरी क्लब ने एक सामाजिक जबाबदारी म्हणून सोबत येवून ह्या “पाणी अडवा,पाणी जिरवा” चळवळीला मूर्त रुप दिले आहे.
आतापर्यंत खालील क्लबने योगदान दिले आहे: रोटरी क्लब ऑफ पुणे कॅम्प, रोटरी क्लब ऑफ मंचर, रोटरी क्लब ऑफ आळेफाटा हायवे, रोटरी क्लब ऑफ जुन्नर, रोटरी क्लब ऑफ नारायणगाव, रोटरी क्लब ऑफ नारायणगाव हायवे, रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ चाकण, रोटरी क्लब ऑफ चाकण एअरपोर्ट, रोटरी क्लब ऑफ बारामती, रोटरी क्लब ऑफ दौंड, रोटरी क्लब ऑफ नगर रोड, रोटरी क्लब ऑफ शिक्रापुर, रोटरी क्लब ऑफ इंदापूर, रोटरी क्लब पुरंदर, रोटरी कम्यिनिटी कॉर्प्स,पुणे कॅम्प,सासवड, रोटरी कम्युनिटी कॉर्प्स,पुणे कॅम्प,करंदी, रोटरी क्लब,भोर, रोटरी क्लब तळेगाव, रोटरी क्लब मावळ, रोटरी क्लब चिंचवड, रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईट, रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण, रोटरी क्लब ऑफ फुरसुंगी, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी, रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा, रोटरी क्लब ऑफ शिवाजीनगर, रोटरी क्लब ऑफ कोथरुड, रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर, रोटरी क्लब ऑफ डायनामिक भोसरी.
हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कॅम्प चे अध्यक्ष रो. प्रदीप खेडकर व जिल्हा कृषी अधिकारी श्री. संजय काचोळे ह्यांचे फार मोठे योगदान आहे. District WASH Team 2023-24 चे रो. माधव तिळगुळकर (District Director for WASH) व रो. सतिश खाडे (Mentor for WASH) यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प चालू आहे.