RCP Midtown - Rotaract joint activity- Chess Competition
Back
कॉम्पिटिशन- चेस महागुरु
आपल्या रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाउन तर्फे डिसुझा चेस अकॅडमी व रोट्रॅक्ट क्लब ऑफ BMCC यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत टाटा हॉल, बीएमसीसी कॉलेज येथे भव्य चेस कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत ३०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये 35 हून अधिक दृष्टिहीन स्पर्धकांनी देखील उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
सकाळी प्रेसिडेंट डॉ. चंद्रशेखर वल्हवणकर, चेस मास्टर श्री. जयंत गोखले, प्रिन्सिपल डॉ. दीपक पौडेल, पंडित सर, रोट्रॅक्ट प्रेसिडेंट यश, सौ. डिसुझा व श्री. केविन डिसुझा या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
प्रेसिडेंट डॉ. चंद्रशेखर वल्हवणकर यांनी रोटरी क्लब व रोट्रॅक्ट क्लबच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर प्रमुख पाहुणे चेस मास्टर जयंत गोखले यांनी उपस्थित स्पर्धकांना मार्गदर्शन केले. चीफ ऑर्बिटर यांनी स्पर्धेचे नियम व अटी समजावून सांगितल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
निर्धारित वेळ व गुणपद्धतीनुसार एकूण सात राऊंड्स घेण्यात आले. सातव्या अंतिम राऊंडपर्यंत स्पर्धकांमध्ये तितकीच चुरस व उत्साह पाहायला मिळाला. सहभागी स्पर्धक, विद्यार्थी व पालक यांचा दिवसभर टिकून असलेला उत्साह विशेष उल्लेखनीय होता.
सायंकाळी ६.०० वाजता या वर्षीचे रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. संतोष मराठे, BMCC कॉलेज, प्रिन्सिपल डॉ. दीपक पौडेल व चेस मास्टर जयंत गोखले यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ पार पडला. चीफ ऑर्बिटर यांनी विजेत्या स्पर्धकांची नावे जाहीर केली व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना ट्रॉफीज, प्रशस्तीपत्रके व 75000 रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून प्रदान करण्यात आली. तसेच इतर सर्व सहभागी स्पर्धकांना पार्टिसिपेशन सर्टिफिकेट व खाऊ देण्यात आला.
संपूर्ण स्पर्धेचे नियोजन व सूत्रसंचालन रोट्रॅक्ट क्लब ऑफ BMCCच्या सर्व सभासदांनी अतिशय उत्तम प्रकारे केले. VP रो. डॉ. शुभदाताई जठार यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमास रोटरी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.आपण सर्वांनी उपस्थित राहून व सक्रिय सहभाग नोंदवून ही स्पर्धा यशस्वी केली. 🙏
Rtn. Rajkumar Tambe