District Governor - Rtn. Manjoo Phadke
Apr-2024
Editor - Rtn. Madhur Dolare

स्वरसम्राज्ञी - अभिजात स्वरानुभूती' तून उलगडले लता मंगेशकर पर्व Back
भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेल्या अजरामर गीतांची सुरेल मैफल : रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ कल्चरल कमिटीतर्फे आयोजन ; स्मित फाऊंडेशनला आर्थिक मदत

पुणे : मोहे पनघट पे नन्दलाल छेड़ गयो रे....ओ घटा साँवरी, थोड़ी-थोड़ी बावरी...नील गगन की छाँव में ...गुमनाम है कोई बदनाम है कोई....यारा सिली सिली....परदेसिया ये सच है पिया अशी एकाहून एक सरस गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेली गाणी सादर करीत स्वरसम्राज्ञी - एक अभिजात स्वरानुभूती ही सुरेल मैफल रंगली. आपल्या गायकीतून कलाकारांनी लता मंगेशकर पर्वाची अनुभूती प्रेक्षकांना दिली.

रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ कल्चरल कमिटीतर्फे आयोजित भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेल्या अजरामर गीतांची सुरेल मैफल "स्वरसम्राज्ञी - एक अभिजात स्वरानुभूती" या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन कोथरूड मधील यशवंतराव चव्हाण नाटयगृहात करण्यात आले होते. यावेळी रोटरी क्लबच्या प्रांतपाल मंजू फडके, प्रांतपाल इलेक्ट शितल शहा, क्लबच्या कल्चरल कमिटीच्या संचालिका अमृता देवगांवकर, सहसंचालिका स्नेहल भट, होस्ट क्लब अध्यक्ष जिग्नेश कारिया उपस्थित होते. मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

विशेष मुलांसाठी कार्यरत असलेल्या स्मित फाऊंडेशनला आर्थिक मदत देण्यात आली. रोटरी क्लब ऑफ पुणे बाणेर, रोटरी क्लब ऑफ पुणे बावधन एलिट, रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण पुणे व रोटरी क्लब ऑफ आळेफाटा यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला आहे.

माई री मैं कासे कहूँ या दस्तक चित्रपटातील गीतापासून स्वर मैफिलीची सुरुवात झाली. इक शहंशाह ने बनवा के हसीं ताज-महल...पानी पानी रे...रात ढलने लगी या गाण्याच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी दाद दिली. यावेळी लतादीदींच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. ये दिल तुम बिन कही लगता नही हे मोहम्मद रफ़ी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील गीताने संगीताच्या सुमधूर काळाची सफर प्रेक्षकांना घडवली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात झूठ बोले कौवा काटे...कही दीप जले...जाना था हमसे दूर...रात भी है कुछ भिगी...जिंदगी उसकी है ही गीते सादर झाली. स्नेहल भट यांचे निवेदन बहारदार व समर्पक होते.

स्वरमैफलीत शीलू मेहता, स्वरदा गोडबोले, दीपक महाजन, केतन गोडबोले यांनी गायन केले. मुकेश देढिया, अभिजीत भदे, अमान सय्यद, विशाल गंड्रतवार, सचिन वाघमारे यांनी साथसंगत केली. अमृता ठाकूरदेसाई यांचे संगीत संयोजन होते. रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज, गांधीभवन, टिळक रोड, फिनिक्स, कोथरूड, कर्वेनगर, वारजे, विज्डम, साऊथ व सारसबाग या सदस्यांनी देखील सहभाग घेतला आहे.
प्रांतपाल मंजू फडके यांच्या हस्ते कलाकारांचे सत्कार करण्यात आले. कल्चरल कमिटी अध्यक्षा अमृता देवगांवकर यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाला रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.