ऋतूचक्र
वसंत म्हणाला, ग्रीष्म येणार ,
उन्हाळ्यात मला, नक्की भेटणार,
मी ऋतुराज, आमराई फुलवणार,
तो का,मृगजळ शोधणार?
वर्षा ,शरद हातात हात घालणार,
गौरीगणपती, महालक्ष्मी जोडिनी पुजणार,
वर्षा चिंब भिजणार ,तर ,
शरद मात्र, चांदण्या रात्री चमकणार,
हेमंत ,शिशिर च्या आगमनाची, तयारी करणार ,
गुलाबी थंडीत, धुक्यात रमणार,
शिशिर मात्र, रुक्ष हेमंत मागून येणार ,
कडाक्याच्या थंडीत, उब, मिळवायला धडपडणार,
वसंत ,ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर ,ऋतू बहरले
भारतीय सण आणी पिकांचे चक्र, ऋतूनी एकत्र बांधले.
सौ. वृषाली श्रीपाद आंबेकर
रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयल
सखाग्रीष्म
ग्रिष्मास वेड लावी, ही रुक्षता, न सहावी,
ऋतू मोहरे परंतू , तृष्णा अती रहावी,
नीर पात्र कोरडे ही ,जल टंचाई, ही व्हावी,
वात संचयाने, अंगी उष्णता बळावी,
थोडे ,थंड, हलके ही, अन्न प्राशन करावे,
दही, ताक, रसाळ फळाने, पित्ताग्नी शांत व्हावे,
तळपत्या भास्करास, राम राम ते म्हणावे,
सन्धेस नित्य कर्मे, उर्कावयास जावे,
एवढे च नित्य आम्ही,पथ्य हे पाळावे,
आंबा, कलिंगड, द्राक्षे, खरबूज नित्य खावे,
कैरी पन्हे संगे, लिंबू सेवन करावे,
मोगर्यास बहरुनी, फुल फुल यावे,
रोम रोम्ं मोहरुनी, सुवासिक व्हावे,
सखा ग्रिष्मास अलगद त्याने, आलिंगन द्यावे.
सौ. वृषाली श्रीपाद आंबेकर
रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयल
एल निनो
एल निनो नी, वर्षा चा ,पाठलाग केला,
प्रशांत महासागरात, खळबळाट झाला,
समुद्र त्यामूळे, ताप ताप तापला,
ढगाला त्याने, मग कोरडाच पाडला,
पाऊस खुपच, कमी झाला ,
मोसमी वारा, दुरवर भरकटला ,
ला निना ला ,केली विनवणी,
वाचव आता, तुच पृथ्वी राणी ,
ला निना मग आला ,
समुद्र त्याने, पटकन गार केला,
त्याने ढगाचा, जलाशय केला,
पृथ्वीवर, गारांचा सडा पाडला,
नैसर्गिक अत्याचार मानवाने केला,
म्हणुन पृथ्वीचा, समतोल ढ़ळला,
एल निनो, ला निना डोक्याचा झाला भुगा,
निसर्ग हानी वर ,तोडगा काढायलच हवा.
सौ. वृषाली श्रीपाद आंबेकर
रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयल