नका पेटवू उग्र धूप
वास सहन होत नाही
त्रास होतो याचा खूप
नका वाजवू हा ढोलताशा
नका लावू जोरात गाणी
शांतपणे करा ही आरती
मलाही आवडते साधी रहाणी
भाव तुमचे कळतात मला
कशाला करता हा फापटपसारा
गरिबाला अन्न अडलेल्याची सेवा
तिथेच असेल माझा निवारा
देवाच्या ह्या मूर्तीत मला
खेदाचे हो अश्रू दिसले
सोडवा येथून मला कसेही
त्यानेच आपणहून असे विनवले
रो. निनाद जोग
रोटरी क्लब ऑफ पुणे युवा