Editor
Rtn. Shubhangi Mulay
May-2025
District Governor
Rtn. Shital Shah

रोटरी क्लब भोर राजगड Back

रोटरी क्लब भोर  राजगड आयोजित दोन दिवसीय RYLA संपन्न

भोर शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांना व आगटे क्लास मधील विद्यार्थ्यांनी RYLA मध्ये मार्गदर्शन पर व्याख्यानांचा आनंद घेतला.

 दिनांक २८ मे व *दिनांक २९ मे २०२५ रोजी विविध विषयांवरती मार्गदर्शनपर  व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.

दिनांक २८ मे रोजी 'यशाची सूत्रे" *या विषयावर रो. डॉ.आनंदा कंक यांनी मार्गदर्शन केले

ध्येय निश्चिती, कठोर परिश्रम, वेळेचे व्यवस्थापन, चांगली संगत, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि  नियोजन ही यशाची सूत्रे सांगत विद्यार्थ्यांना विविध महापुरुषांचे दृष्टांत देत त्यांनी यशाचा कानमंत्र दिला.

व्यक्तिमत्व विकासासाठी स्वप्रतिमा कशी निर्माण करावी याविषयी रो.प्रा. डॉ. श्रीकांत निकम यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना सोप्या भाषेमध्ये दृश्य चित्र दाखवत प्रोजेक्टरवर विद्यार्थ्यांनी याचा आनंद घेतला. 

दिनांक २९ मे रोजी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे  माजी प्रांतपाल रो.मोहन पालेशा यांनी मार्गदर्शन केले

" मोठ्या प्रभावी  व्यक्तींच्या सात  सवयी"या विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी  विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

मानसोपचार तज्ञ रो.वृंदा वाळिंबे यांनी मनाची एकाग्रता व स्मरणशक्ती याविषयी शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केले. अभ्यासाचे नियोजन ,टाईम टेबल कसे करावे ,एकाग्रता कशी वाढवावी, बुद्धी तल्लख ठेवण्यासाठी कोणते व्यायाम करावेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. 

यावेळी रोटरी क्लब ऑफ भोर राजगडचे अध्यक्ष डॉ.रूपाली म्हेत्रे सचिव रो.अभिजीत बांदल, रो.राजश्री शेटे ,डॉ संजय म्हेत्रे,क्लासेसचे मिहिर आगटे, डॉ.योगेंद्र आगटे ,केशव शेटे ,अनुराधा कोंढाळकर इ व इतर सर्व रोटेरीयन्स उपस्थित होते.