Editor
Rtn. Shubhangi Mulay
June-2025
District Governor
Rtn. Shital Shah

रोटरी क्लब ऑफ पेण Back

स्वावलंबनाकडे वाटचाल

रोटरी क्लब ऑफ पेण आणि जय प्रिसिशन प्रॉडक्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ मे रोजी महिलांसाठी सशक्तीकरण उपक्रम यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमात १०० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांना स्वावलंबना च्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करणे हा होता.

या कार्यक्रमात महिलांना विविध स्वरूपाचे मार्गदर्शन आणि सहाय्य प्रदान करण्यात आले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनेक महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी संधी उपलब्ध होणार असून, त्या आपल्या कुटुंबाच्या अर्थकारणात मोलाची भर घालू शकतील. या उपक्रमामुळे महिलांमध्ये स्वयंपूर्ण होण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला.

या उपक्रमामुळे महिलांना समाजात खंबीरपणे उभे राहण्यासाठी दिशा आणि आशा प्राप्त झाली. मिळालेले प्रशिक्षण त्यांना आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने पुढे जाण्यास निश्चितच मदत करणार आहे. काही महिलांनी सांगितले की, या संधीमुळे त्यांच्या कुटुंबाचे आयुष्य अधिक स्थिर आणि सक्षम होईल.

रोटरी क्लब ऑफ पेणच्या अध्यक्षा संयोगिता टेमघरे म्हणाल्या, “महिलांचा विकास म्हणजे कुटुंब, समाज आणि राष्ट्राचा विकास. असे उपक्रम महिलांना स्वावलंबनाकडे नेणारा नवा मार्ग उपलब्ध करून देतात.”

जय प्रिसिशन प्रॉडक्ट्स इंडिया प्रा. लि. या कंपनीकडून एचआर एक्झिक्युटिव्ह चित्रा मॅडम यांनी सामाजिक दृष्टिकोनातून लाभदायक उपक्रमात सहभागी झाल्याचा आनंद व्यक्त केला आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी कंपनी पुढेही अशा उपक्रमांमध्ये योगदान देत राहील असे सांगितले.

या उपक्रमाने महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून, भविष्यातही असे कार्यक्रम राबवले जातील, असे रोटरी अध्यक्षा संयोगिता टेमघरे यांनी जाहीर केले.