रोटरी की स्मार्ट पाठशाला
रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवारवाडा व केसर कॉम्प्रेसर प्रायव्हेट कंपनी यांच्या अथक प्रयत्नाने दिनांक २९मार्च २०२५ रोजी रोटरी की स्मार्ट पाठशाला या प्रकल्पांतर्गत मुळशी तालुक्यातील तेरा शाळांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप कारण्यात आले, यामध्ये स्मार्ट इंटिरिऍक्टिव्ह बोर्ड,
स्मार्ट टीव्ही,
e लर्निंग सॉफ्टवेअर,
मुलींसाठी स्वछता गृह,
शिक्षकासाठी प्रिंटर,
शाळेसाठी इन्वरटर,
सी सी टी वि यंत्रणा
तसेच शाळेसाठी लागणारे माईक सिस्टिम तसेच खेळाचं साहित्य देण्यात आले.
एकूण मिळून रूपये 31,00,000/-( रुपये एकतीस लाख ) एवढा खर्च कारण्यात आला, या प्रसंगी केसर कॉम्प्रेसरचे फायनान्स हेड मा. कैलास नायर, रोटरीचे प्रांतपाल शीतल शहा रोटरी डिस्ट्रिक्ट बेसिक एडुकेशन डायरेक्टर संतोष परदेशीं, शनिवारवाडा क्लबचे मुख्य ट्रस्टी किशोर महाजन, रोटरी क्लबचे प्रेसिडेंट श्री शंतनु जोशी, रोटरी डिस्ट्रिक्ट सीएसआर डायरेक्टर धनश्री जोग व सर्व शाळांचे मुख्याध्यापक, विद्यार्थी, शिक्षक व पालक हजर होते, या उद्घाटन समयी विद्यार्थ्यांना या सर्व वस्तूंचा अतिशय चांगला उपयोग होईल तसेच शिक्षकांचा वेळ वाचेल आणि चांगल्या पद्धतीने शिक्षण प्रक्रिया राबवता येईल असे मत मांडण्यात आले.'
सर्व शालेय मुख्याध्यापकांनी रोटरी क्लब पुणे शनिवार वाडा चॅरिटेबल ट्रस्ट व केसर कॉम्प्रेसर या कंपनीचे मनापासून आभार मानले. भावी पिढी घडवताना अशा पद्धतीच्या प्रकल्पामुळे आमचे हात बळकट होतील व आम्हांला चांगले नागरिक घडवण्यात खुप मदत होईल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. माननीय प्रांतपाल रो.शितल शहा यांनी आपल्या मनोगतामध्ये रोटरीची कार्यप्रणाली व तसेच रोटरीचा बेसिक एज्युकेशन व लिटरसीमध्ये असलेल्या रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या कामाच्या सहभागाबद्दल माहिती दिली.