Rotary Club of Walherkarwadi
Back
नमस्कार, रामकृष्ण हरी
सर्व आदरणीय रोटेरियन्स यांनी आम्हाला सहकार्य केले म्हणून आज दिनांक 9/11/2025 रोजी
*" *शाश्वत शेती कार्यशाळा व प्रदर्शन कालठाण इंदापूर* "
येथे अतिशय उत्स्फूर्त सहभागात व उत्साहात पार पडले रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी व जिजाऊ इन्स्टिट्यूट कालठाण नंबर एक ,डीस्ट्रीक,ईनव्हायरमेंट अव्हेन्यु यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत सहभागी रोटरी क्लब इंदापूर, इंदापूर सेंट्रल, भिगवण, दौंड, आणि बारामती यांचे सहकार्याने कालच कार्यक्रम पार पडला
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे कृषिमंत्री, दत्ता (मामा) भरणे, प्रांतपाल श्री संतोष मराठे, माजी प्रांतपाल प्रदिप जेजुरीकर, जिल्हा पर्यावरण समितीने चे डायरेक्टर डॉ. राजेंद्र सराफ, चेअरमन श्री गोविंद जगदाळे सर, व प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले श्री. मनोहर खके, श्री. रविंद्र बनसोड सर, संतोष लाटणेकर सर, व भास्करराव गटकुळ सर, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला यासाठी मोलाची मदत झाली ती गटकुळ सर व सौ. गटकुळ मॅडम यांनी अक्षरशः दहा दिवस अगोदर सर्व परिसर पिंजून, फोन करून, निरोप पाठविला, व शाश्वत शेती कार्यशाळा या कार्यक्रमात शेतकरी यांची संख्या वाढली जवळपास दोनशे शेतकरी जमा करण्याचे धाडस केवळ आणी केवळ गटकुळ परिवारच करु शकतो आणि त्यांच्या या अथक परिश्रमाचे फलित काल अनुभवायला मिळाले उच्च विद्याविभूषित, तरीही अतिशय विनम्र परंतु विलक्षण कार्यक्षमता या मुळे हे सर्व जुळुन आले. तसेच रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी चे संस्थापक अध्यक्षांच्या संकल्पनेतून व आम्हाला(मला आणि जगदाळे सर) दिलेली खुली छुट व आदरणीय रोटेरियन्स नी सहभाग नोंदवून सहकार्य केले त्यात प्रामुख्याने रो. सुभाष भाऊ वाल्हेकर, रो. शशांक भुमकर,खजिनदार माऊली गोविंदराव जगदाळे सर व विजया देवी जगदाळे मॅडम यांनी अक्षरशः जिवांचे रान करून या उपक्रमात सहभागी होऊन आम्हाला उपकृत केले कार्यक्रमाच्या सहा तासांच्या प्रवासात गोविंदराव जगदाळे सर व विजया देवी जगदाळे मॅडम यांनी व गटकुळ सर व मॅडम हे सदासर्वदा सावधान स्थितीत होते गटकुळ सर व मॅडम यांनी स्वताच्या जागेत उभ्या असलेल्या डौलदार इमारतीत या उपक्रमास सर्व काही लागणारी सामग्री व यंत्रणा उपलब्धता करून दिली ६०० sq. ft. हाॅल लाइट, पाणी, स्टेज माईक खुर्ची सह पंखे, प्रोजेक्टर हे केवळ आणी केवळ गटकुळ सर व मॅडम यांनी उपलब्धता करून दिली म्हणूनच शक्य झाले या सर्व उपक्रमांत डी. जी. श्री. मराठे सर यांच्या उपस्थितीने अजूनच शान वाढवली व District Environment Avenue चे डायरेक्टर डॉ. राजेंद्र सराफ सर यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे व रोटरी क्लब भिगवण चे प्रेसिडेंट निखिल भोगावत, दौंड चे प्रेसिडेंट दिपक सशाम, बारामती चे करामती प्रेसिडेंट रविकिरण खारतोडे व इंदापूर चे नितिन शहा, व ज्ञानदेव डोंबाळे इंदापूर सेंट्रल चे या सर्व सन्माननीय रोटेरियन्स नी सहभाग नोंदवून सहकार्य केले सर्वात महत्त्वाचे म्हणजे आदरणीय कृषीमंत्री ना दत्ता (मामा) भरणे यांच्या उपस्थितीने तर हा उपक्रम बहरलाच या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण ठरले ते कृषी प्रदर्शन यात दहा स्टॉल धारक यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली वरिल सर्व सन्माननीय रोटेरियन्स नी सहभाग नोंदवून सहकार्य केले त्यामुळे कालचा दिवस अतिशय उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सहकार्या मुळे उपक्रम पुर्णत्वास नेला त्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देतो व आभार व्यक्त करतो अशीच येत्या काळात होणाऱ्या प्रोजेक्टला आपण सर्वांनी अशीच असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो 🙏
आपला विश्वासू
*भरत चव्हाण
* अध्यक्ष
*रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी*