District Governor - Rtn. Manjoo Phadke
Apr-2024
Editor - Rtn. Madhur Dolare

Women's day celebration at RCP Katraj Back
दि ९ मार्च रोजी साप्ताहिक सभेत इव्हेंट डायरेक्टर रो नुकूल दिनकर यांच्या संकल्पनेतून "ती च्या उत्तुंग भरारीला ती ची मानवंदना" हा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रो विवेक कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या अमानोरा पार्क येथील आरोग्य शिबीराची माहिती दिली, तसेच रो अंजली हूगे यांनी पोलिओ लसीकरण संदर्भात केलेल्या कामाचं कौतुक केले, नाट्यवाचन स्पर्धेमध्ये सहभागी कलाकारांचे कौतुक केले. मुख्य कार्यक्रमात ॲन मधुरा दिनकर हिने आपल्या खुमासदार शैलीत संपूर्ण सभेचे सुत्रसंचालन केले. या कार्यक्रमात भारतातील पुराण काळातील माँसाहेब जिजाऊ ते सध्याच्या काळातील मिताली राजपर्यंतच्या व्यक्तीमत्वांची ओळख क्लबमधील महिलांनी ओघावत्या शैलीत करून दिली. कात्रज क्लबमधील साप्ताहिक सभेत एवढ्या मोठ्या संख्येने महिला सहभागी होण्याचा कदाचित पहिलाच प्रसंग असावा. या कार्यक्रमात रोटरी कात्रज परिवारात सहभागी होऊ इच्छित असणारे सहाना आणि राजीव हल्लुर, अर्चना ताटकर, ॲड प्रज्ञा गुजर यांनी आपापली ओळख करून दिली. या कार्यक्रमासाठी मधुरा हिने आठवडाभर सर्वांनी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खुप कष्ट घेतले होते. या सभेत रो मिलिंद पाटील यांनी सचिव पदाची जबाबदारी सांभाळली होती. रो नुकुल आणि मधुरा यांच्या सुरुची फेलोशिपने कार्यक्रमाची सांगता झाली.
The entire credit of Women's Day program goes to incredible RCPK Ladies ... their participation was the real reason for such unique concept becoming successful. We had 20+ RCPK Ladies participated and presented Super Achiever Great women of India.
महिलादिन साजरा करुयात अशी मधुरानी घातली साद, सर्व क्लबच्या भगिनींनी दिला प्रचंड प्रतिसाद |
जिजाऊ, येसुबाई यांच्यासह सावित्रीबाई, आनंदीबाई यांनी नेले इतिहासात, शांताबाईंच्या परिचयाचे मन रमले गीतात |
शकुंतला देवींची बुद्धी संगणकापेक्षा न्यारी, या सगळ्यावर जनाबाईंची ओवी पडली भारी |
ऐकुनी सिंधुताईची कहाणी मन गेले भरुन, असेच हेलावले मन नीरजाच्या बलिदानातून |
किरण बेदी होत्या रणरागिणी, मिताली व मेरी कोम होत्या मैदानाच्या राणी |
एव्हरेस्ट शिखर सर करून, बच्छींद्र पालने मिळवून दिला सर्वोच्च  किताब |
अनेक ज्ञात अज्ञात  महिलांनी राखली भारताची आब, म्हणूनच  सर्व महिलांच्या वतीने दोन ओळी.
देश हा देव असे माझा, अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा | काही राहिले असेल तर  क्षमस्व
- Rtn Varsha Hirwe