मैत्रिणींनो खास तुमच्याकरता
नमस्कार, माझ्या सर्व प्रिय मैत्रिणी, लेडी प्रेसिडेंट्स व ॲन्स. प्रत्येकीची २४ - २५ वर्षासाठीची धावपळ सुरू असेलच आणि तुम्ही सर्वजणी छान तयारी करतच असाल. तरीसुद्धा आपण आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी सज्ज राहणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या क्लबमध्ये खेळीमेळीचे वातावरण तयार करणे, प्रत्येकाशी संवाद साधणे आवश्यक आहे. प्रत्येक फर्स्ट लेडीने आपल्या बेटर हाफला सतत सपोर्ट करणे, बीओडी अरेंज करण्यात पुढाकार घेणे, ठरलेले प्रोजेक्ट्स उत्साहात, सर्वांच्या सहभागाने होण्याकरता प्रयत्न करणे , खास ॲन्स साठीचा एखादा प्रोग्राम आयोजित करणे जेणेकरून सर्वजणी सहभागी होतील अशा विचाराने पुढे जावे आणि माझी खात्री आहे की नक्कीच आपल्या टीमवर्कने हे वर्ष यशस्वी होईल.
प्रत्येक क्लबच्या लेडी रोटेरीयन्सनी आपल्या स्वतःच्या ओळखीतून एक लेडी मेंबर आपल्या क्लबमध्ये रोटेरियन म्हणून सामील करून घ्यावा, ज्यामुळे लेडी रोटेरियन्सची संख्या तर वाढेलच पण मेंबरशिप वाढण्यास देखील मदत होईल. अशाप्रकारे जर प्रत्येकीने क्लबमध्ये उत्साहपूर्ण वातावरण तयार करून काम केले तर हे वर्ष सर्वांसाठी यशस्वी होईलच याची मला खात्री आहे. महत्त्वाचं म्हणजे सर्व लेडीरोटेरियन्स करता आणि ॲन्स करता आपण डिस्ट्रिक्टच्या वतीने काही खास कार्यक्रम आखले आहेत. या कार्यक्रमांची माहिती वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईलच आणि हो, तुम्ही सर्वजणी या कार्यक्रमांमध्ये नक्की सहभागी व्हा बर का! सख्यांनो माझी आग्रहाची विनंती आहे तुम्हाला.
SO BE READY.
All The Best For The Rotary Year 24 - 25 Ahead.
And I Am Always There To Help You All Anytime Needed.
तुमची रागिणी
फर्स्ट लेडी २०२४ - २५