वृक्षारोपण अहवाल
डिस्ट्रिक्ट 3131 च्या MEGA TREE PLANTATION DRIVE च्या अंतर्गत, सोमवार दिनांक 11ऑगस्ट 25 ला रोटरी क्लब ऑफ पुणे खराडी आणि रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पुणे पोलीस यांच्या मदतीने सुमारे 90,000 रोपे लावण्याचा प्रकल्प संपन्न झाला. ही रोपे सिंहगड कॉलेज रोड पार्किंग लगतच्या वनखात्याच्या जमिनीवर आणि सिंहगड रोड वरील नियोजित पोलीस स्टेशनच्या इमारती सभोवताली लावण्यात आली. या कार्यक्रमासाठी सिनियर पोलीस इन्स्पेक्टर श्री. दिलीप डोईफोडे, PSI एस .एस.चव्हाण आणि त्यांची टीम, सिंहगड कॉलेजचे स्पोर्ट्स डायरेक्टर NSS चे 25 विद्यार्थी घेऊन उपस्थित होते. या विद्यार्थ्यांनी झाडे लावण्यासाठी मदत केली. तसेच रोटरी क्लब सिंहगड रोड च्या सेक्रेटरी रो. प्रियांका लागू, रो. शरद लागू आणि Environment डायरेक्टर रो.अलका देशपांडे उपस्थित होते.