दिनांक 26 जुलै 2025 साक्षीची राखी या रोटरी क्लब वाल्हेकरवाडी आयोजित या उपक्रमास संपूर्ण महिला रोटरीयन तसेच फिटनेस क्लब च्या महिला व माऊली गृप जिजाऊ सोशल फाउंडेशन जगदाळे क्लासेस शेखर अण्णा चिंचवडे युवा फाउंडेशन वाल्हेश्वर भजनी मंडळ मैत्री स्वयं सहायता महिला बचत गट आणि रोटरी क्लब वाल्हेकरवाडी सर्व सन्माननीय सभासद यांच्या उत्स्फूर्त व भव्य दिव्य अशा प्रतिसादात आज दृष्टी 10% पण जिद्द 100% अशा या साक्षीची राखी या उपक्रमास सर्वांनी भरभरून प्रतिसाद व साक्षीस बळ देण्याचे जे काम केले आहे त्यास तोड नाही खरे म्हणजे ही संकल्पना रोटरी क्लब वाल्हेकरवाडी चे प्रोजेक्ट डायरेक्टर संदीप भालके व ज्योतीताई भालके यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली ही जिद्दीची कहाणी आज पूर्णत्वास नेताना आम्हास अतिशय आनंद होत आहे तसेच डिस्ट्रिक्ट 3131 असिस्टंट गव्हर्नर प्रणिता मॅडम यांनीही या कार्यक्रमास हजेरी लावून साक्षीचे बळ व रोटरी चे महत्व पटवून देण्यासाठी वैयक्तिक रित्या फक्त एका फोनवर हजर राहून क्लबच्या उपक्रम त्यांनी हजेरी लावली त्याबद्दल प्रणिता अलोरकर मॅडम आपले हार्दिक आभार रोटरी क्लब वलेकरवाडी व परिसरातील सर्व सुजान महिला व नागरिकांनी या साक्षीस बळ दिले आणि तिच्या स्वप्नांना दिशा दाखवण्यासाठी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी भरत चव्हाण अध्यक्ष रोटरी क्लब वाल्हेकरवाडी व.सेक्रेटरी वसंतराव ढवळे आपले मनापासून हार्दिक आभार व्यक्त करीत आहे .