तृष्णा
वळीव होऊनी ये आणि,
स्वप्नांतरी भिजवून जा l
तुझ्या एका कटाक्षाने,
रोमांचित करून जा ll
भ्रमर बनुनी ये आणि,
कळीला उमलवून जा l
सुगंधाने भारलेले,
एक वन फुलवून जा ll
चंद्र बनुनी ये आणि,
रात्रीला उजळून जा l
रातराणीच्या फुलाला,
हलकेच चुंबून जा ll
विश्वास बनुनी ये आणि,
प्रीतीला वचन देऊन जा ll
साद तुला मी घालिता,
प्रतिसाद तू देऊन जा ll
रो. मंजिरी शहाणे
रोटरी क्लब ॲाफ पुणे युनिव्हर्सिटी