रोटरी क्लब ऑफ पेण
अध्यक्ष २४ - २५ : रो. संयोगिता टेमघरे
क्लबची माहिती :-
क्लबची ओळख महणजे ३० वर्षांची समर्पित सेवा आणि शाश्वत नवकल्पना. गेल्या तीन दशकांत रोटरी क्लब ऑफ पेणने विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. वॉश (WASH) प्रकल्पांतर्गत एसटी स्टँडवर पाणपोई, आशा किरण स्कूल (पानेड) येथे शौचालय ब्लॉक, आंबेडकर शाळेत पाण्याची टाकी आणि वॉशबेसिन, तसेच विराणी आदिवासी वाडीत बोरवेल उभारण्यात आली.
साक्षरता मोहिमेत आदिवासी महिलांना सही आणि वृत्तपत्र वाचण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. कोरोना काळात घरगुती गणपतींचे विसर्जन योग्य पद्धतीने करण्यात आले, ज्याला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. तसेच गरजू रुग्णांना रक्तपुरवठा करण्यात क्लबने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
दिव्यांग मुलांच्या प्रशिक्षण केंद्रासाठी ४० सीटर बस उपलब्ध करून दिली. या प्रशिक्षण केंद्रातील जवळपास ७० दिव्यांग मुलं या बस सेवेचा लाभ घेताहेत.
पीओपी गणपती मूर्तींचे पर्यावरणपूरक विघटन करून त्यातून कॅल्शियम निर्मिती करण्यात आली, ज्याचा उपयोग खडू तयार करण्यासाठी करण्यात आला.
या सर्व उपक्रमांमधून रोटरी क्लब ऑफ पेणने समाजसेवेत आपली बांधिलकी कायम सिद्ध केली आहे.