Editor
Rtn. Shubhangi Mulay
June-2025
District Governor
Rtn. Shital Shah

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स Back

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स

अध्यक्षा
२४ - २४ : रो. ज्योती राजिवडे

क्लबची माहिती :-

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स हा आगळा वेगळा दिव्यांग लोकांचा क्लब आहे. रोटरीच्या इतिहासातील दिव्यांगांचा जगातील पहिला क्लब आहे ज्याची संस्थापक अध्यक्षा एक महिला आहे व सर्व मेंबर्स हे दिव्यांग आहेत. याची मूळ वैशिष्ट्ये ही आहेत की दिव्यांग देखील समाजाचं काहीतरी देणं लागतो. या उद्देशाने सर्व दिव्यांग बांधव एकजुटीने तनमन धनाने क्लब मध्ये काम करत आहेत. चॅलेंजर क्लब ने आतापर्यंत १८ प्रोजेक्टस यशस्वीरित्या आयोजित केले आहेत. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

. डॉक्टर डे सी डे

. दिव्यांग मुलांची वैद्यकीय तपासणी

. अनाथ मुलांची वैद्यकीय तपासणी

. वारकरी भाविकांची वैद्यकीय तपासणी

. गुरुवर्यांचा सन्मान

. वृक्षारोपण

. रक्षाबंधनाचा कार्यक्रम

. ८५० विद्यार्थ्यांचा, ॲनिमिया, दंत, ब्लडचेक, त्वचारोग चेकअप.

. शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांचा सन्मान

१०. वोकेशनली अवार्ड

११. २०० विद्यार्थिनींचा अस्मिता प्रोजेक्ट

१२. नवरात्रीमध्ये नवदुर्ग मातेचा सन्मान

१३. आनाथ मुलींच्या वस्तीगृहामध्ये अस्मिता प्रोजेक्ट

१४. आदिवासी समाजातील लोकांना दिवाळीनिमित्त दिवाळी फराळ एक महिन्याचं रेशन देणे

१५. दहावीच्या  विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या पूर्वतयारीचे प्रशिक्षण.

१६. दिव्यांग आनंद मेळावा जागतिक दिव्यांग दिनानिमित्त

१७. गणेश कला क्रीडा मंच पुणे येथे दिव्यांग नोकरी  महोत्सव

१८. नवीन आर.सी.सी. क्लब ऑफ चॅलेंजर्सची स्थापना

 क्लब मधील सर्व मेंबर्स एकजुटीने काम करतात आणि इथून पुढेही अजून चांगले प्रोजेक्ट्स करण्याचा त्यांचा मानस आहे.

 रोटरी क्लब चॅलेंजर्स मुळे समाजातील लोकांचा दिव्यांग बांधवांकडे पहाण्याचा दृष्टिकोन खूप बदलला आहे. त्यामुळे रोटरी क्लब चॅलेंजर्स ने एक ब्रीद वाक्य केलं आहे की

"आम्ही दिव्यांग बांधव घेणाऱ्यांमध्ये नाही तर आम्ही देणाऱ्यांमध्ये आहोत" आणि  हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे.

आणि हे केवळ रोटरीच्या ताकदीमुळे आणि रोटरी क्लबच्या निमित्ताने एकत्र आल्यामुळेच शक्य झालं असा सर्व क्लब सदस्यांचा ठाम विश्वास आहे.