मानवच करतोय मानवी जीवनाचा संहार
निष्पाप जीव अन सृष्टीवर होतोय प्रहार
वर्चस्व आणि स्वार्थ हे युद्धाचे उगमस्थानी
हवे आपणास बुद्ध महावीरांचे आगम
लाखो कोटी सैन्य अन जीवाचा जातो बळी
भय, अराजक हाटतच नाही जगातुन मुळी
दहशतवाद आणि अतिरेकी हल्ले जणू जगाला शाप
अणुयुद्ध ,बॉम्बहल्ले घडेल जगताचा सर्वनाश
दृष्ट प्रवृतीची करा सर्वकाळ निवृत्ती
अनुसरा बुद्धाचा मार्ग प्रज्ञा , शील, करुणा, वृत्ती
विश्वाच्या कल्याणासाठी माऊली मागते पसायदान
अध्यात्मासहित विज्ञान यातच आहे जगाचे कल्याण
रो.डॉ.आनंदा कंक
रोटरी क्लब ऑफ भोर- राजगड