रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलने रो. शैलेश पोटे यांच्या अध्यक्षतेखाली व मेडीकल डायरेक्टर रो. डॉ लक्ष्मण आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे वैद्यकीय उपक्रम राबवले.
दिनांक २५जुलै रोजी पनवेल आरोग्य प्राथमिक केंद्र क्रमांक १ येथे, सुदृढ माता सुदृढ बालक या जाणिवेतून, गरोदर स्त्रियांना प्रोटीनची अधिक मात्रा असलेले पौष्टिक खाद्यपदार्थ क्लबतर्फे देण्यात आले.तसेच गरोदरपणातील चाचणीसाठी लागणारे डॉपलर मशीन आज, पनवेलमधील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. संजीवनी गुणे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संचालिका डॉ. रेहाना मुजावर यांना प्रदान करण्यात आले.
या प्रोजेक्टच्या सांगतेनंतर लगेचच उपस्थित सर्व रोटेरियन्स नी डिस्ट्रीक्टच्या छत्रछाया या प्रोजेक्ट अंतर्गत रस्त्यावरील, तसेच बाजारपेठेतील गरीब गरजू विक्रेत्यांना ऊन पावसापासून संरक्षक अशा मोठ्या छत्र्यांचे वाटप करून
आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले. मानवता, संवेदना आणि सेवा ही रोटरीची ओळख सार्थ करत आज रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल, तीन समाजोपयोगी उपक्रम करण्यात यशस्वी ठरला.
रो. आरती मनोहर
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल