रोटरी मराठी साहित्य संमेलन २०२५-२६ Back
रोटरी मराठी साहित्य संमेलन २०२५-२६

कधी कधी एखादा कार्यक्रम फक्त कार्यक्रम राहत नाही...
तो एक सामूहिक भावना बनतो... एक अविस्मरणीय अनुभव ठरतो.

२० व २१ डिसेंबर २०२५, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज व २० सहयजमान क्लब
यांनी साकारलेले दुसरे रोटरी मराठी साहित्य संमेलन हा भाषेचा, विचारांचा आणि संस्कृतीचा असाच एक
अविस्मरणीय उत्सव होता.

पहिल्या आवृत्तीच्या भव्य यशानंतर ही दुसरी आवृत्ती आणखी एका उंचीवर पोहोचली. अधिक सखोल संवाद,
अधिक समृद्ध सादरीकरण आणि महाराष्ट्रभरातून मिळालेला प्रचंड प्रतिसाद.. संपूर्ण वेळ हाऊसफुल असलेल्या
सभागृहात २,२०० हून अधिक साहित्यरसिक एकत्र आले. उत्साह जाणवत होता.. आणि अभिमानही.

कार्याध्यक्ष मधुमिता बवे आणि सहकार्याध्यक्ष मोहन चौबळ यांच्या नेतृत्वाखाली प्रांतपाल संतोष मराठे,
उपप्रांतपाल उज्ज्वल केळे, माजी प्रांतपाल शीतल शाह, क्लब अध्यक्ष शभ्रो सेन, आणि मार्गदर्शक राजीव बवे यांच्या
भक्कम पाठिंब्याने डिस्ट्रिक्टमधील २१ क्लबनी आयोजित केलेले हे संमेलन संघभावनेचे एक सुंदर प्रतीक ठरले.

संमेलनाध्यक्ष प्रख्यात साहित्यिक प्रवीण दवणे आणि उद्घाटक विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या
उपस्थितीने या संमेलनाला भक्कम वैचारिक अधिष्ठान लाभले.

चित्रपट आणि साहित्यावरील परिसंवाद...
डाव्या व उजव्या विचारसरणीवरचे सखोल विश्लेषण...
माध्यमांची भाषा आणि साहित्यभान...
रोटरी परिवारातील गझलकारांचं गझल संमेलन...
तसेच
डॉ. श्रीपाल सबनीस, अमोल पालेकर, संभाजी भिडे गुरुजी यांच्याशी झालेल्या संस्मरणीय गप्पा..
प्रत्येक कार्यक्रमाने प्रेक्षकांना समृद्ध केले.

साहित्याबरोबरच सांस्कृतिक अभिव्यक्तीलाही या संमेलनात विशेष स्थान देण्यात आले. “हे बंध रेशमाचे”
या संगीत नाटकाने रसिकांची मने जिंकली, तर “कोऽहम” या सांस्कृतिक कार्यक्रमाने मराठी माणसाच्या
भावविश्वाला साद घातली.

प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांना व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्डही यानिमित्ताने देण्यात आला.

या संमेलनाच्या यशामागे भक्कम भागीदारी उभी होती मुख्य प्रायोजक नंदन बिल्डकॉन यांची. कार्यक्रम निर्मिती
व प्रसिद्धीसाठी नंदन बिल्डकॉनचा पाठिंबा अतिशय महत्त्वाचा होता.

सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र व पी.एन.जी. एक्सक्लुसिव्ह यांची साथही मोलाची होती.
एच.डी.एफ.सी. म्युच्युअल फंड, काजल्स अटेलियर, स्टील एड्स, बिक्सन्स बॉयलर्स यांचे आर्थिक पाठबळ, तसेच
केवळ रोटरीच्या व मराठी संस्कृतीच्या प्रेमाखातर आर्थिक मदत देणारे रो. सुरेश नातू, रो. स्नेहल भट, श्री राजन
कुलकर्णी यांचाही उल्लेख आवर्जून करावा लागेल.

रेडिओ पार्टनर बिग एफएम, आउटडोअर पब्लिसिटी पार्टनर रेव्हेल, आणि पाध्ये मीडिया सर्व्हिसेस यांच्या
सहकार्याने प्रिंट, रेडिओ आणि सोशल मीडियामधून मराठी साहित्याचा आवाज दूरवर पोहोचला.

या संमेलनानंतर मिळालेल्या प्रतिक्रिया अत्यंत भावस्पर्शी आणि प्रेरणादायी ठरल्या. अनेक रोटेरियन आणि
साहित्यरसिकांनी आयोजनामागील अथक मेहनत, संघभावना आणि मनापासूनची तळमळ प्रत्येक क्षणी जाणवत
असल्याचे आवर्जून नमूद केले. मागील वर्षीच्या तुलनेत रोटरी मराठी साहित्य संमेलन अधिक उंचीवर नेण्यात
यश आल्याची भावनाही अनेकांनी व्यक्त केली. साहित्य आणि संस्कृतीचा हा सोहळा मनाला समृद्ध करणारा,
अभिमान वाटावा असा आणि स्मरणात राहणारा ठरल्याचे अनेकांनी सांगितले. या निमित्ताने निर्माण झालेले
आपुलकीचे नाते आणि जिव्हाळ्याचे क्षण यांचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.

हा उपक्रम आता रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१च्या वार्षिक कार्यक्रमांमधील एक महत्त्वाचा सोहळा ठरत आहे, अशी
भावना व्यक्त होत असतानाच याचं पुढचं पाऊलही आता ठरलेलं आहे.

तिसरे रोटरी मराठी साहित्य संमेलन १८, १९ आणि २० डिसेंबर २०२६ रोजी आयोजित होणार आहे. ज्यामध्ये १९
डिसेंबर रोजी चिंचवड येथे संपूर्ण दिवसभराचा विशेष कार्यक्रम असेल.

तेव्हा लवकरच पुन्हा भेटूया – १८ डिसेंबर २०२६

रोटरी मराठी साहित्य संमेलनाचा यजमान क्लब आहे रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज.

या वर्षीचे सहयजमान क्लब्स आहेत:

रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्ट, रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट, रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड, रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबाग, रोटरी क्लब ऑफ पुणे डेक्कन जिमखाना, रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर (निगडी), रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती, रोटरी क्लब ऑफ पुणे हिलसाइड (पुणे साऊथ), रोटरी क्लब ऑफ पिंपरी एलिट, रोटरी क्लब ऑफ पुणे हटके रोड, रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो, रोटरी क्लब ऑफ पुणे मिड-ईस्ट, रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवारवाडा, रोटरी क्लब ऑफ भोर-राजगड, रोटरी क्लब ऑफ पुणे विस्टा, रोटरी क्लब ऑफ पुणे पाषाण, रोटरी क्लब ऑफ पुणे ग्रिफिनिक्स, रोटरी क्लब ऑफ पुणे NIB

 

रो. मोहन चौबळ
सहकार्याध्यक्ष, रोटरी मराठी साहित्य संमेलन २०२५-२६