रोटरी क्लब ॲाफ आळेफाटाच्या वतीने डायलिसिस सेंटरचे लोकार्पण व त्यानुमित्ताने आरोग्यशिबिर आयोजन
Back
रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल, सिद्धकला हॉस्पिटल पेण व श्री हॉस्पिटल आळेफाटा यांच्या वतीने श्री हॉस्पिटल आळेफाटा येथे रोटरी डायलिसिस सेंटरचे उद्घाटन व हृदयरोग व मूत्ररोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी सिद्धकला हॉस्पिटल पेणच्या डॉ. सोनाली वानगे, रोटरी क्लब पुणे डाऊन टाऊनच्या झोनल प्रमुख पल्लवी साबळे, रोटरी क्लब पेणच्या प्रेसिडेंट इलेक्ट नेवाळे, रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रलचे अध्यक्ष विजयकुमार आहेर, उपाध्यक्ष संभाजी हाडवळे, सचिव पराग गांधी, संस्थापक महावीर पोखरणा, माजी अध्यक्ष आणि प्रोजेक्ट इन्चार्ज ज्ञानेश जाधव, हेमंत वाव्हळ, राजेंद्र भळगट, अक्षय शिंदे, विजय कणसे, ऍड संजय टेंभे, रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रलचे सर्व सदस्य, उपस्थित होते. ग्रामीण भागातील गरजूंना डायलिसिस उपचार घेण्यासाठी पुणे किंवा अहमदनगर या ठिकाणी जावे लागत होते, परंतु आळेफाटा या ठिकाणी ही सुविधा रोटरी मार्फत उपलब्ध करून देण्यात आली असल्याने गरजू रुग्णांना या सोयीचा लाभ होईल. जुन्नर तालुक्यात किडनी विकार व त्यासाठी लागणारी डायलेसिस ही उपचार पद्धती उपलब्ध नाही. डायलिसिस करण्यासाठी सर्व रुग्णांना नगर ,कल्याण, पुणे किंवा नाशिक हे शंभर किंवा त्याहून जास्त किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी जावे लागत होते .आळेफाटा हे जुन्नर तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे आळेफाटा रोटरी क्लबने ही गरज ओळखून आळेफाटा या ठिकाणी डायलिसिस सेंटर चालू केले आहे. जुन्नर तालुक्यातील सर्व गरजू रुग्णांना यामुळे आळेफाटा या ठिकाणी येणे आणि उपचार घेणे सोपे होणार आहे. तसेच या उद्घाटनानिमित्त हृदयरोग व मूत्ररोग या आजारांवरील शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 300 लोकांनी सहभागी होऊन उपलब्ध उपचारांचा लाभ घेतला.