CSR Awards Back

रोटरी जिल्हा ३१३१  आयोजित “ईएसजि - सीएसआर समिट आणि अवॉर्ड्स २०२६ ” उत्साहात संपन्न

पुणे :  रोटरी जिल्हा ३१३१ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “ईएसजि - सीएसआर समिट आणि अवॉर्ड्स 2026” हा भव्य कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शिक्षण , आरोग्य , समाजहित, पर्यावरण संवर्धन ,  महिलांचे सबलीकरण आणि शाश्वत विकास यामध्ये कॉर्पोरेट क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि रोटरी यांच्यातील भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने या शिखर परिषद व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मेरीगोल्ड बँक्वेट्स बावधन पुणे येथे नुकताच या सोहळा पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा सी एस आर  संचालिका धनश्री जोग यांच्या स्वागतपर आणि प्रास्ताविक भाषणाने झाली. त्यांनी  ईएसजि - सीएसआर क्षेत्रातील बदलत्या संकल्पना, सामाजिक जबाबदारीची गरज आणि रोटरीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.

कमलेश कार्ले यांनी संयोजक म्हणून कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली तसेच ESG - CSR Award मागील संकल्पना स्पष्ट करून तिचे महत्त्व सांगितले.

यानंतर प्रांतपाल रो  संतोष मराठे यांनी आपल्या मनोगतात रोटरी आणि कॉर्पोरेट क्षेत्र यांच्यातील समन्वयातून समाजात मोठा सकारात्मक बदल घडवून आणता येतो, असे सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या  व सुझलॉन एनर्जी लिमिटेड च्या स्वतंत्र संचालिका सीमंतिनी खोत यांनी ईएसजि  आणि सीएसआर या विषयावर मार्गदर्शन करताना सामाजिक गुंतवणुकीचा दीर्घकालीन परिणाम, शाश्वत विकासाची आवश्यकता आणि उद्योग क्षेत्राची सामाजिक बांधिलकी यावर सखोल विचार मांडले.

यानंतर ईएसजि  विषयावरील विशेष पॅनेल चर्चेचे आयोजन करण्यात आले. या चर्चेत  इंप्रो इंडस्ट्रीज चे व्यवस्थापकीय संचालक श्री श्रीकांत कारकरे, विलो माथेर अँड प्लांट चे डॉ. रवींद्र उतगीकर आणि रिलायन्स इंडस्ट्रीस च्या वरदा कुलकर्णी यांनी  धोरणे, पर्यावरणीय जबाबदारी, सामाजिक परिणाम आणि उत्तम प्रशासन पद्धती यावर आपले विचार मांडले. पॅनेल चर्चेचे सूत्रसंचालन डॉ. जिग्नेश पंड्या यांनी केले. त्यांनी विविध प्रश्नांच्या माध्यमातून पॅनेल सदस्यांकडून मार्गदर्शक विचार मांडून घेतले.

रोटरीचे सीएसआर भागीदार  आणि  व्हल्कन टेकनॉलॉजिएस प्रा ली  चे ब्यावस्थापकीय संचालक श्री राजेश मिश्रा,  तसेच जे एस डब्लू च्या सी एस आर हेड  रूपा दवणे यांनी “पॉवर ऑफ पार्टनरशिप ” या विषयावर आपले अनुभव मांडले. रोटरीसोबत काम करताना मिळालेला सकारात्मक अनुभव, सामाजिक प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी आणि  सीएसआर उपक्रमांमधून निर्माण झालेला सामाजिक परिणाम याबाबत त्यांनी माहिती दिली.

सीएसआर प्रकल्पांचे लाभार्थी प्रतिनिधी म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा प्रकल्प अधिकारी (महिला व बालकल्याण) आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे तसेच डी वाय पाटील च्या डॉ. शैलजा माने यांनी मानवी दूध बँक बद्दल रोटरी आणि  सीएसआर भागीदारांसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. समाजातील वंचित घटकांपर्यंत मदत पोहोचविण्यात रोटरी च्या माध्यमातून या भागीदारीचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, समुदाय विकास आदी विविध क्षेत्रांमध्ये प्रभावी सीएसआर प्रकल्प राबविणाऱ्या कॉर्पोरेट संस्थांना रोटरी जिल्हा ३१३१  तर्फे पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. प्रांतपाल संतोष मराठे , रो डॉ तनुजा मराठे , डीआर एफसी रो पंकज शाह , रो चारू श्रोत्री , रो मोहन पालाश , रो नितीन ढमाले , रो मंजू फडके , रो रश्मी कुलकर्णी , रो विवेक दीक्षित यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले ।

या पुरस्कारांसाठी प्राप्त झालेल्या अर्जांचे परीक्षण आणि निवड प्रक्रिया स्वतंत्र परीक्षक मंडळाने पार पाडली. या परीक्षक मंडळामध्ये ब्रिगेडियर अनिमिष रानडे (निवृत्त) विएसएम,  सामाजिक क्षेत्रातील वरिष्ठ तज्ज्ञ श्री  किरण इनामदार आणि शिक्षणतज्ज्ञ मंजुषा वैद्य यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सीए रवी राजापूरकर यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व मान्यवर, सहभागी संस्था, सीएसआर भागीदार आणि रोटरी सदस्यांचे आभार मानले.

या कार्यक्रमासाठी सीएसआर जिल्हा को -डायरेक्टर विपीन घाटे , संयोजक कमलेश कार्ले ,  उन्मेष रिसबूड , अभिजित गांधी , दीपक शाह , सुभरो सेन, रामदास जैद , नितीन महाजन आणि जिल्हा ३१३१ चे विविध सह यजमान क्लब चे प्रेसिडेंट यांनी मोलाचे सहकार्य केले