Editor
Rtn. Shubhangi Mulay
March-2025
District Governor
Rtn. Shital Shah

प्रेसिडेंट Back

रोटरीची मजा घेण्याकरता                                                

एकदा प्रेसिडेंट होऊन पहा,

दुसऱ्यांकरता जगण्याचा

आनंद एकदा घेऊन पहा

 

आधी ठरवा डायरेक्टर्स

कमिट्या त्यांच्या बनवत रहा,

मिटींगा, चर्चा, करता करता

चहा, कॉफी पीत राहा

 

ऍडमिन असतो नेहेमी बिझी

वक्ते, श्रोते, फेलोशिप कोणती,

सर्वांना खूष करता करता

बजेट नेहेमी सांभाळत रहा 

 

प्रोजेक्ट्जसाठी आयडियाज भरपूर

मदतीचे हात येती पुढे,

प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावरती

गरजूंच्या चेहेऱ्यावर हास्य पहा

 

रोटरीचे असे म्हणणे असते

कार्य त्यांचे पसरवीत रहा,

वर्षभर तू स्मित हास्याने

मेंबर, एपीएफ जमवत रहा

 

 रोट्रॅक्ट, इंटरॅक्ट कार्यक्रमांतून

लहान मुलांशी कनेक्ट रहा,

त्यांच्याबरोबर कामे करता

आपले बालपण आठवत रहा

 

वाटे सोपे, आहे खडतर

प्रत्येक पीपी सांगत असतो,

ऊन सावलीच्या या रस्त्यावर

एकदा तरी चालून पहा

 

अध्यक्ष रो. निवेदिता मुळे

रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास