Editor
Rtn. Shubhangi Mulay
June-2025
District Governor
Rtn. Shital Shah

रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊन Back

रोटरी नेत्र रुग्णालय

 रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊनच्या माध्यमातून विविध प्रकारे समाजसेवा प्रकल्प होत असतात. असाच  समाजोपयोगी वैद्यकीय उपक्रम  रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊन व रोटरी क्लब ऑफ जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केला आहे. यामध्ये जुन्नर येथे रोटरी आय हॉस्पिटल सुरू झाले आहे. या हॉस्पिटलचे उद्घाटन मा. डीजी रो. शीतल शहा, यांच्या शुभहस्ते  संपन्न झाले आहे.

या हॉस्पिटलचे व्यवस्थापन PE Rtn. डॉ. चंद्रशेखर वळवणकर,  ( MD , नेत्ररोग) व डॉ.तेजस्विनी वळवणकर तोडकर, ( MBBS ,DOMS नेत्ररोग),  डॉ. ओंकार सहाणे ( नेत्ररोग) हे तज्ञ करणार आहेत. हे हॉस्पिटल अत्याधुनिक तंत्रद्यान संपन्न असून अत्यल्प दरामध्ये नेत्ररोगीयांवर उपचार करणार आहे. ग्रामीण भागातील जनतेला व गरीब रुग्णांना नेत्रविकारांवर उपचार मिळावेत हा या हॉस्पिटलचा प्रमुख उद्देश आहे.

 हॉस्पिटलचा पत्ता – Rotary Eye Hospital, Shivraj Building,  Opp S T Stamd , Junner  

Time 10 am to 4 am

तरी सर्व रोटरी क्लब यांना विनंती आहे की  आपण व आपल्या क्लबचे सभासद यांनी रोटरी आय हॉस्पिटला भेट द्यावी, आपले EYE Checkup and surgery प्रकल्प या हॉस्पिटल मध्ये राबवावेत. तसेच आपल्या भागातील नागरिकांना ही माहिती देऊन जास्तीत जास्त रुग्णांनी या प्रकल्पाचा लाभ घ्यावा.   नेत्रतपासणी, ऑपरेशन (मोतीबिंदू, डोळ्यांचे पाणी वाहणे, पापण्या व वाकड्या भुवया सरळ करणे, डोळ्यांत परकीय पदार्थ शिरणे इत्यादी) व चष्मे (इंडियन ऑप्टिकल अँड सायंटिफिक व्हिजन सेंटर सोशल प्रोजेक्ट) या विभागात लाभ घ्यावा. या रोटरी आय हॉस्पिटल, जुन्नर तर्फे त्यांना विशेष सवलत दिली जाईल.