कालच मी रात्री त्यांचे 1964 मधील गाणे ऐकले आणि मी गाऊन पाहिले. अतिशय गोड गळ्याची गायिका आज आपल्यात नाही हे खरेच वाटत नाही.
एका युगाचा अस्त झाला. महमद रफी, मन्ना डे, किशोरकुमार, तलत मेहमूद, गीतादत्त, लता मंगेशकर, आशा भोसले आणि आता सुमन कल्याणपूर सर्व एकापेक्षा एक सरस गायक गायिका आपल्यात आज नाहीत.आपण खूप नशीबवान ज्यांना उत्तम गीते, गाणी ऐकायला मिळाली. त्याचा आनंद आपण घेतला. पण हे आवाज कायमचे थांबले ज्यांनी प्रत्येक हृदयावर राज्य केले.
अर्थात त्यांच्या रेकॉर्डिंग्स मुळे त्यांचे आवाज अमर झाले आहेत.
सुमनताईंना माझी शब्दसुमनांजली
रो रजनी दुवेदी- रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण पुणे