Project by RC Walhekarwadi
Back
Help from the Rotary club of walhekarwadi in Bhum Paranda, Dharashiv district flood affected farmers in the first Number where nobudy is reached RCW is reached first
अध्यक्ष, रोटरी क्लब वाल्हेकरवाडी या नात्याने आपणा सर्व दानशूर उदात्त हेतू चे पुरस्कर्ते आणि संवेदनशील अशा आपण सर्व दात्यांचे, आम्ही एक सामाजिक संस्था *रोटरी* *क्लब* *वाल्हेकर वाडी* या नात्याने आभार व्यक्त करतो व मराठवाड्यात झालेल्या अपरिमित हानी च्या संवेदना कुठेतरी मनाला लागून भयानक विनाशक अशा आपत्तीचे चित्र बघून आमचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप दादा वाल्हेकर व त्यांचे बंधू संदीप दादा वाल्हेकर यांचे मनही हेलावले त्यांनी ही गोष्ट आमच्या क्लब कडे म्हणजे सर्व समावेशक व प्रत्येक ठिकाणी पर्यावरण संरक्षणाचा विचार करणारे गणेश जी बोरा तसेच ॲड. श्री व सौ सोमनाथ जी हारपूडे ह.भ.प.प्रत्येकाच्या काळजाचा ठाव घेणारे व संवेदना समजून कार्याचा झेंडा समर्थपणे आपल्या खांद्यावर नेणारे ह.भ.प. आय.पी.पी जगदाळे सर तसेच आमचे सेक्रेटरी व सर्वेसर्वा वसंतराव ढवळे दांडगा जनसंपर्क असलेले सचिव व सामाजिक कार्यात अतिउच्च स्थान असलेले वसंतराव. त्याच प्रमाणे प्रोजेक्ट डायरेक्टर संदीप भालके जरी राजकीय वारसा असला तरी राजकारणाचे जोडे बाहेर काढून काळ वेळ तहानभूक विसरून आपण आणि फिटनेस गुरु शशांक भुमकर व सौ.भुमकर, खजिनदार सर्व रोटेरियन्स यात सचिन खोले जी, सुभाष भाऊ वाल्हेकर, सुधीर मरळ, रेश्मा बोरा, जयश्री भामरे ,जगदाळे माया ताई, मॅडम ,आणि विशेष म्हणजे वयाची सत्तरी पार केलेले तरुण गोविंदराव चितोडकर यांनी आणि सर्वच रोटरी क्लबचे आदरणीय सदस्य तसेच सर्व दानशूर आणि कर्तव्यदक्ष आपल्या शहरातील तसेच महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील सुजाण नागरिक व सर्वात महत्त्वाचे म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेतील ही चिमुकली फुले तसेच काही खाजगी संस्था खिवसरा पाटील व प्रेरणा शाळा सर्व सामाजिक संस्था ज्यांच्या जाणीव संवेदना माणुसकी आणि प्रसंगी तन-मन-धनाने रोटरी क्लब वाल्हेकरवाडी च्या एका हाके वर *"एक मूठ धान्य पूरग्रस्तांसाठी* " * या संस्थापक अध्यक्षांच्या संकल्पनेतून आणि पर्यावरण मॅन यांच्या क्रिएटिव्ह डोक्यातून उत्पन्न झालेल्या योजनेसाठी दिलेत तसेच सदिच्छा प्रतिसाद म्हणून आपण जे काही रोटरी क्लब वाल्हेकर वाडीच्या संकल्पने स बळ दिले व विश्वास,आपली खंबीर साथ व एक मूठ करिता करिता आम्ही आपल्या बळावर किमान *400* किट तसेच *100* साड्या, कपडे, धान्य,बिस्कीटे, चादरी, पाण्याच्या बॉटल्स आणि बरेच काही घेऊन आम्ही दिनांक 29 /09/ 2025 रोजी ट्रक भर साहित्य जमा केले पण हे साहित्य पॅक करून लोड करायचे व त्याची वाहतूक करायची वितरण कशी करायची या विचारात असतानाच आमच्या पाठीचा कणा म्हणजे रोटरी क्लब चे सदस्य श्री संदीप दादा वाल्हेकर यांनी एका क्षणात तो भार हलका केला व रात्री साडेअकरा वाजता ट्रक भरून शिवाजी चौक वाल्हेकर वाडी तून पहिली मदत चे ट्रक आम्ही भुम परंडा साठी रवाना केली तसेच ही मदत व्यवस्थित रित्या वाटप होण्यासाठी सकाळी सहा रोटेरियन्स तेथे साडेदहा वाजेपर्यंत पोहोचलो पण तेथे आमची काही ओळख नव्हती परंतु आमच्या पांडुरंगाने म्हणजे ह भ प गोविंदाने आमची प्रार्थना ऐकली व प्रत्येक संकटाचा तारण हार म्हणून जसा क्रिकेटचा देव सचिन तसाच आमच्या रोटरी चे तारणहार सचिन जी खोले यांनी सर्व वितरण व्यवस्था सांभाळली.यादरम्यान काही ठिकाणी थोडा संयम ही सुटत होता, त्यावेळी आमचे आदर्श रोटरीयन व माजी सचिव व आदर्श शिक्षक रामेश्वर पवार यांनी शिक्षकी पेशाला साजेल अशा लिलया पद्धतीने परिस्थिती हाताळली त्यांच्या जोडीला किशोर बागुल तसेच भोगेवाडी चे जाधव सर हे सर्व ह्या व्यवस्थेत कुठेही कसर किंवा कमी पडू दिले नाही तसेच तेथील वितरण व्यवस्था सांभाळण्यासाठी जगदाळे सरांचे भाचे व त्यांचे मित्र अनुक्रमे श्री भास्करराव वारे व श्री दत्तात्रय काळे यांनी तर सिंहाचा वाटा उचलला प्रत्येक गावात जाऊन हानी पोहोचलेल्या शेतकऱ्या पर्यंतच मदत पोहोचली याची सर्व काळजी या दोघांनी जीवा चं रान करून घेतली शेवटी सर्व साहित्य वाटप करता करता आम्हाला रात्री साडेनऊ वाजलेत पण पण या 11 तासांच्या तासांच्या प्रवासात एकही रोटरीयन न थकता न भागता किंवा तहान भुकेची पर्वा न करता या बळीराजाच्या दुःखात किमान एक सुखाची फुंकर मारण्यासाठी झटत होता यात जगदाळे सरांचे दाजी वारे साहेब यांनी दुपारी आग्रहाने जेवू घातले व मदतकार्य पुन्हा सुरू केले ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत संपवले व उर्वरित साहित्य श्री भास्कर वारे व दत्तात्रय काळे यांच्या सुपुर्त करून त्यांना ते व्यवस्थित व योग्य हातात देण्यास सांगून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो दिनांक 24 पासून ते १ ऑक्टोबर पर्यंत अव्यहात व कसलीही परवा न करता सर्व रोटेरियन्स खास करून माझ्या रोटरियंस भगिनी नी या कामात सिंहाचा वाटा उचलला तेव्हा त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत कारण आपल्या संवेदनांना आणि आपण केलेल्या कामाला तोडच नाही तरी देखील एक औपचारिकता म्हणून मी अध्यक्ष ,रोटरी क्लब वाल्हेकरवाडी च्या नात्याने आपले सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो व आपल्यापुढे नतमस्तक होत आहे असेच आपले सत्कार्य अव्याहत चालू राहो हीच सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद.
भरत चव्हाण
अध्यक्ष, रोटरी क्लब वाल्हेकरवाडी 25-26