रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती च्या पुढाकाराने जनकल्याण रक्तपेढी येथे ऑटोमॅटिक ब्लड कॉम्पोनंट एक्सट्रॅक्टर या मशीनचा लोकार्पण सोहळा
Back
पुण्यातील जनकल्याण रक्तपेढी येथे ऑटोमॅटिक ब्लड कॉम्पोनंट एक्सट्रॅक्टर या मशीनचा लोकार्पण सोहळा दि. आठ एप्रिल रोजी पार पडला. हा प्रकल्प रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती, डिस्ट्रिक्ट 3131 आणि कॅनडा स्थित रोटरी क्लब ऑफ बॅरी - ह्युरोनिया डिस्ट्रिक्ट 7010 यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण करण्यात आला. मशीन मध्ये रक्तातील प्लेटलेट्स, रेड सेल्स, व्हाईट सेल्स याचे काही मिनिटात वर्गीकरण होऊन त्या त्या रुग्णास जरूरीप्रमाणेच रक्तघटक दिले जाऊ शकतात. यामुळे रुग्णास कमी खर्चात उपचार होतात.
उपकरणाची किंमत $31000 (सुमारे 27 लाख रु.) असून ही रक्कम Canada तील क्लब्आणि पर्वती क्लब, नी डिस्ट्रिक्ट 3131 व रोटरी फाउंडेशन च्या मदतीने उभी केली आहे. कॅनडातील पीडिजी ब्रायन स्टेल आणि पुण्यातील पीडिजी
विनय कुलकर्णी व रश्मी कुलकर्णी यांचा सिंहाचा वाटा आहे. जनकल्याणचे डायरेक्टर डॉ अतुल कुलकर्णी, न्यास व्यवस्थापक डॉ आशुतोष काळे आणि विश्वस्त सुरेश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प अस्तित्वात आला.
पुढील 10 ते 12 वर्षे हे मशीन कार्यरत राहणार असून प्रतिवर्षी सुमारे 15000 रुग्णांना याचा फायदा होईल . रो.क्लब पर्वतीचे अध्यक्ष रो.स्वानंद समुद्र , पुढील दोन वर्षांचे डिस्ट्रिक्ट 3131चे गव्हर्नर रो.संतोष मराठे, रो. नितीन ढमाले, पीडिजी विनय व पीडिजी रश्मी कुलकर्णी, या प्रसंगी उपस्थित होते. निर्वाचित अध्यक्ष डॉ. वृषाली खिरे यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्र संचालन रो. माया फाटक यांनी केले. कार्यक्रम जनकल्याण रक्तपेढी येथे संपन्न झाला.