ईश्वरी देणगी ही स्त्रीस मातृत्वाची,
जननी, जन्मदात्री मानव जातीची ll
आई म्हणजे झरणी स्नेहाने झरणारी,
बाळावरी ममतेच्या उबेची पाखर घालणारी ll
पोषण करी बाळाचे तिच्या गोड अमृतमयी दुधाने,
घडवी त्याचे सारे आयुष्य सर्वांगीण संगोपनाने ll
बालक म्हणजे कळी हळूहळू उमलणारी,
आईच्या प्रेमळ संगतीने सुगंध दरवळणारी ll
प्रेम आईचे आणि पान्हा पोषणाचा,
घडवी सुदृढ नागरिक या देशाचा ll
बाळाच्या संगोपनासाठी आई करी जिवाचे रान,
त्यास्तव हरपूनी जाई सारे तिचे देहभान ll
सुदृढ राखण्या माता आणि बालकांचे आरोग्य,
रोटरी जगताने उचलली पाऊले सुयोग्य ll
आरोग्य चिकित्सा, संवर्धना तयांच्या सदैव असे तत्पर,
आरोग्य शिबिरे, विविध लसी, पोलिओ निर्मूलनाला धावी सत्वर ll
झटे तयांच्या शिक्षण अन् शारीरिक स्वच्छता जागृती साठी,
बांधूनी स्वच्छतागृहे, वाटप सॅनिटरी पॅडचे त्यांच्या आरोग्यासाठी ll
कमतरता भासता अमृतासम दूध मातेचे,
'ह्युमन मिल्क बँक' करी पोषण बालकांचे ll
चला धरूनी हात हाती आपण सारे रोटेरियन्स,
घडवू उज्वल भविष्य करुनी माता सुदृढ अन् बालसंगोपन ll
रो. सुनिता उज्वल केले
रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड