Rotary Club of Walhekarwadi Back
विशेष दिवस : ग्रंथराज ज्ञानेश्वर जयंती 

दिनांक १३/०९/२०२५
वार : शनिवार
पितृपक्षातील अन्नदान हेच श्रेष्ठदान या प्रकल्पांतर्गत अवघ्या तीन दिवसांपूर्वी केलेल्या आव्हानाला मिळालेल्या प्रतिसादामुळे आज हा प्रोजेक्ट पूर्णत्वास गेला त्याबद्दल सर्व रोटरी तसेच नॉन रोटरी सदस्यांचे मनस्वी आभार. तसे पाहता वृद्धापकाळ हा सर्वांनाच येतो परंतु वृद्धाप काळामध्ये अध्यात्माची साथ मिळाली तर तो आणखीन सुखकर होतो खरं पाहता काही अपघातामुळे म्हणा किंवा पूर्वकर्मामुळे म्हणा काही लोकांना वृद्धाश्रमामध्ये राहावं लागतं परंतु आपण याच्याकडे जर पॉझिटिव्हले पाहिलं तर आळंदी सारख्या ठिकाणी ही लोक वृद्धापकाळ व्यतीत करत आहेत आलेल्या परिस्थितीला आनंदी समजून ते जीवन जगत आहेत त्यांना आपल्या परिने फूल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण हे अन्नदान दरवर्षी करत आहोत आणि यामध्ये आपण सर्वजण सहभागी होत आहात त्याबद्दल पुन्हा एकदा मनस्वी आभार आज आपल्या क्लब मार्फत अंदाजे रुपये 15000 किमतीचे अन्नधान्य  ( गहू ,ज्वारी, बाजरी, तांदूळ ,साखर ,तुरडाळ ,कपडे, धुण्याची पावडर, साबण, तेल ,डबा इ.) आपुलकी वृद्धाश्रमामध्ये यावर्षी २५ वृद्ध व्यक्तींना सांभाळले जात आहे शिवाय आतापर्यंत साधारणता दीडशे व्यक्तींना पुन्हा त्यांच्या घरी पाठवण्याचं यश ह .भ. प. श्री बोराडे महाराज यांना मिळालेला आहे.
हे अन्नधान्य वाटप करते प्रसंगी क्लबचे अध्यक्ष भरत चव्हाण, सचिव वसंत ढवळे आणि आय .पी .पी. गोविंद जगदाळे उपस्थित होते.
 
 
 रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी तर्फे वयात येणाऱ्या मुलींसाठी मार्गदर्शन सेमिनार
 
दिनांक 19 सप्टेंबर 2025, शुक्रवार रोजी चिंचवड येथील श्रीमती गोदावरी हिंदी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या पुढाकाराने आणि रोटरीयन डॉ. मोहन पवार सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वयात येणाऱ्या मुलींसाठी विशेष सेमिनार आयोजित करण्यात आले.
या सेमिनारमध्ये डॉ. पवार सरांनी वाढत्या वयातील शारीरिक-मानसिक बदल, त्यातील आव्हाने आणि समस्यांचे निराकरण याबाबत अत्यंत सोप्या व सहज भाषेत मुलींना मार्गदर्शन केले.  कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी विचारलेल्या विविध प्रश्नांची सविस्तर उत्तरे देऊन जवळपास एक तास डॉक्टरांनी संवाद साधला. डॉ. पवार सरांच्या ऊर्जेचे आणि प्रभावी मार्गदर्शनाचे सर्वांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री. ब्रिजेश तिवारी सर, उपप्राचार्या सौ.सुकुमारी पिल्ले मॅडम, सहशिक्षिका सौ.बलजीत कौर आणि इतर सर्व शिक्षकवृंद यांचे विशेष सहकार्य लाभले. या उपक्रमात जवळपास 200 विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
     यावेळी रोटरी क्लब वाल्हेकरवाडी चे अध्यक्ष रो.भरत चव्हाण यांनी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीची संकल्पना व कार्याची माहिती दिली. तसेच आय.पी.पी. रो. गोविंद जगदाळे सर व सर्व सन्माननीय रोटरी सभासदांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. 
रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे सचिव रो. वसंतराव ढवळे (2025-26) यांनी सर्वांचे आभार मानले.
 
Thanks & Regards
 
Mr. Bharat Chavan 
PRESIDENT 
ROTARY CLUB OF WALHEKARWADI